• June 30, 2023
  • No Comment

मॉडेलिंगसाठी काढलेले कपल फोटो व्हायरल करुन बदनामी करण्याची भिती दाखवून तरुणीवर बलात्कार

मॉडेलिंगसाठी काढलेले कपल फोटो व्हायरल करुन बदनामी करण्याची भिती दाखवून तरुणीवर बलात्कार

    पुणे : नाशिक येथे मॉडेलिंगसाठी काढलेले कपल फोटो व्हायरल करुन बदनामी करण्याची भिती दाखवून तरुणीला त्याने आपल्या वासनेचे शिकार बनविले. तिने सातत्याने आपल्याशी संबंध ठेवावेत, यासाठी अॅट्रोसिटीची केस करण्याची धमकी दिली. परंतु, या धमकीला न घाबरता तिने नकार दिला. तेव्हा त्याने ते फोटो वडिलांना पाठविले. या नराधमाला चंदननगरपोलिसांनी अटक केली आहे. करण अण्णा पगारे (वय २५, मुळ रा. सामनगाव, नाशिक, सध्या रा. सोमनाथनगर, वडगाव शेरी) असे अटक केलेल्याचे नाव आहे
    याप्रकरणी एका २१ वर्षाच्या तरुणीने चंदननगरपोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार ऑगस्ट २०२२ पासून आतापर्यंत सुरु होता.

    याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि ओळखी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. नाशिक येथे एका मॉडेलिंगसाठी त्यांचे कपल फोटो काढले होते. करण पगारे हा मुळचा नाशिकचा राहणारा आहे. त्यानंतर तो आता पुण्यात राहण्यास आला आहे. नाशिकमध्ये मॉडेलिंगसाठी काढलेले फोटो नातेवाईक, आईवडिल यांना तसेच सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन करण पगारे याने या तरुणीला वडगाव शेरी येथील स्टे इन लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतरही आपल्याबरोबर शरीर संबंध ठेवावेत, यासाठी त्याने तिच्या कुटुंबियांविरुद्ध अॅट्रोसिटीची केस करण्याची व कपल शुटचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. परंतु, फिर्यादी याने त्यास नकार दिला. तेव्हा त्याने हे फोटो तिच्या वडिलांच्या मोबाईलवर पाठवून बदनामी केली. त्यामुळे तिने पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदविली. पोलिसांनी करण पगारे याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक काळे तपास करीत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *