• June 30, 2023
  • No Comment

तरुणीवर झालेल्या हल्ल्याप्रसंगी गैरहजर असलेल्या तीन पोलिसांचे निलंबन

तरुणीवर झालेल्या हल्ल्याप्रसंगी गैरहजर असलेल्या तीन पोलिसांचे निलंबन

    पुणे: सदाशिव पेठेत दोन दिवसापूर्वी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास आरोपी शंतनू जाधव याने एका तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. या घटनेत तरुणी जखमी झाली असून हल्लेखोरास नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

    पण, घटनास्थळापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पेरूगेट चौकीत पोलिस हजर नव्हते.

    त्यामुळे कर्तव्यामध्ये कसूर केल्याप्रकरणी तीन पोलिस हवालदारांना पोलिस उपायुक्त संदीप सिंह गिल यांनी निलंबन करण्याचे आदेश दिले आहेत.

    पोलिस हवालदार सुनील शांताराम ताठे, पोलिस कर्मचारी प्रशांत प्रकाश जगदाळे आणि सागर नामदेव राणे अशी निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

    घटनेनंतर तब्बल 20 मिनिटांनी पोलीस कर्मचारी पोलिस चौकीत आणि घटनास्थळी दाखल झाले. ही माहिती सोशल मीडियावर समोर येताच, पुणेकर नागरिकांनी त्यावर नाराजी व्यक्त केली होती. तर याच पोलिस चौकीचा आधार जखमी तरुणीला घ्यावा लागला होता.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *