• June 30, 2023
  • No Comment

कारची दुचाकीला धडक; महिलेला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी

कारची दुचाकीला धडक; महिलेला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी

    चिंचवड: कारने दुचाकीला वारंवार धडक देऊन दुचाकीचे नुकसान केले. महिलेला मारहाण करून तिच्याशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला आणि तिच्यासह कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार चिंचवडेनगर येथे घडला.

    सिद्धन्ना राहुल जानकर (वय 35), राजू राहुल जानकर (वय 30), विजय राहुल जानकर (वय 32, सर्व रा. चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सिद्धन्ना आणि राजू या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

    पोलीस उपनिरीक्षक राहुल व्हरकटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला त्यांच्या पती आणि दिरासोबत दुचाकीवरून जात होत्या. त्यावेळी आरोपी सिद्धन्ना याने त्याच्या ताब्यातील कारने फिर्यादी यांच्या दुचाकीला जोरजोरात धडक देऊन दुचाकीचे नुकसान केले.

    आरोपी राजू आणि विजय यांनी फिर्यादी यांच्या पती व दिराला लाथाबुक्क्याने मारहाण केली. फिर्यादी भांडण सोडविण्यासाठी गेल्या असता सिद्धन्ना याने फिर्यादीचे केस धरून त्यांना बाजूला करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादीस अश्लील भाषेत शिवीगाळ करून अश्लील हातवारे करत त्यांचा विनयभंग केला. फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबियांना ठार मारण्याची आरोपींनी धमकी दिली.

    या वादाचे कारण अद्याप समजलेले नाही. फिर्यादी आणि आरोपी यांचा यापूर्वी वाद झाल्याचे पोलीस रेकॉर्ड नाही. गाडीला धक्का देऊन भांडण झाले आहे. आरोपी सिद्धन्ना याच्या विरोधात यापूर्वी एक गुन्हा दाखल आहे. त्यात त्याला पोलिसांनी नोटीस देऊन सोडून दिले होते. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

    Related post

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल असा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या लेन्स कार्ड lenskart या कंपनीचा मनसे कडून जाहीर निषेध

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल…

    लोणी काळभोर: लेन्स कार्ड हे विवाद मध्ये सापडले आहे. कंपनीचे सीईओ पियुष बंसल यांनी ग्रुमिंग गाईड असा एक स्टेटमेंट काढले आहे.…
    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी विजय; अध्यक्षपदी गोरख मेंगडे

    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या निधनानंतर झालेल्या हमाल पंचायतच्या त्रैवार्षिक निवडणुकीत गोरख मेंगडे…
    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७ उमेदवार बिनविरोध, केळी विभागातील एका जागेकारिता मतदान.

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डातील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या अध्यक्षपदी सौरभ कुंजीर यांची बिनविरोध निवड…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *