• July 2, 2023
  • No Comment

बांधकाम व्यवसायिकाची फसवणूक करत बनावट कागदपत्राद्वारे फ्लॅट विक्री

बांधकाम व्यवसायिकाची फसवणूक करत बनावट कागदपत्राद्वारे फ्लॅट विक्री

    वाकड: बांधकाम व्यवसायिकाची खोटी सही व अंगठे तयार करून फ्लॅटचे परस्पर विक्री करत त्या बदल्यात साडेबारा लाख स्वीकारून बांधकाम व्यवसायिकाची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार बारा मे 2023 रोजी वाकड येथील दुय्यम निबंधक कार्यालय येथे घडला आहे.

    याप्रकरणी हनुमंत शंकर भिलारे (वय 41राहणार थेरगाव) यांनी बुधवारी(दि.28) वाकड (Wakad) पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून नितीन उर्फ दत्तात्रय चिंधू कलाटे (वय 36 राहणार वाकड) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याने फिर्यादीची खोटी सही अंगठे व घोषणापत्र तयार करून वाकड येथील सर्वे नंबर 186 मधील द ऑनेक्स या प्रोजेक्टमधील फ्लॅट क्रमांक 803 हा श्रीकांत संजय जाधव यांना बनावट कागदपत्राच्या आधारे 69 लाख 89 हजार रुपयांना विकला त्याबद्दल आरोपीने साडेबारा लाख रुपये घेत दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त तयार करून घेतले. यावरून फिर्यादी, खरीदार तसेच शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा आरोपीवर दाखल करण्यात आला आहे वाकड पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *