• September 8, 2023
  • No Comment

अपंग मुलीचा विनयभंग; पशुसंवर्धन अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

अपंग मुलीचा विनयभंग; पशुसंवर्धन अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

    पुणे : ‘तुला कायमस्वरूपी वेतनश्रेणीवर कामावर घेतो’ असे म्हणून दिव्यांग मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पुणे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाचे तत्कालीन अधिकारी डॉ. शिवाजी विधाते यांच्यावर गुन्हा नोंदविण्याचा आदेश न्यायालयाने बंडगार्डन पोलिसांना दिला आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी चंद्रशेला पाटील यांनी हा आदेश दिला.

    डॉ. विधाते यांनी मुलीला कामासंबंधी चर्चा करण्यासाठी त्याच्या कार्यालयात बोलविले व तिचा विनयभंग केला. डॉ. विधाते सतत पैशाची मागणी करत. तसेच त्यांनी शरीर सुखाची मागणी केल्याची तक्रार मुलीने बंडगार्डन पोलिस ठाण्यात केली होती. बंडगार्डन पोलिसांनी ही तक्रार जिल्हा परिषदेतील विशाखा समितीकडे पाठवून त्याचा अहवाल मागितला होता.

    मोबाईल घेत असताना डॉ. विधाते यांचा हात मुलीला लागला, असा अहवाल समितीने दिला होता. मात्र त्यानंतरही गुन्हा दाखल न झाल्याने मुलीने ॲड. तौसिफ शेख आणि ॲड. क्रांतीलाल सहाणे यांच्यामार्फत न्यायालयात खाजगी तक्रार दाखल केली होती. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत न्यायालयाने डॉ. विधाते यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून चौकशी करावी. चौकशीचा अहवाल तीन महिन्यांत सादर करावा, असा आदेश न्यायालयाने दिला

    Related post

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन निवडणुकीत ८०१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन निवडणुकीत ८०१ मतदार मतदानाचा हक्क…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे: गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या निवडणुकीत यंदा एकूण ८०१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार…
    कसबा पेठेत न्यू गंधर्व बँडकडून अनधिकृत शेड व रस्त्यावर गाड्यांचे अतिक्रमण; नागरिक त्रस्त

    कसबा पेठेत न्यू गंधर्व बँडकडून अनधिकृत शेड व रस्त्यावर…

    पुण्यातील कसबा पेठ परिसरात न्यू गंधर्व बँड या व्यवसायिकाकडून अनधिकृत शेड उभारणे, डेकोरेशनचे साहित्य सार्वजनिक जागांवर अस्ताव्यस्त ठेवणे आणि बँडच्या गाड्या…
    अप्पर तहसील लोणी काळभोर येथे नागरिकांच्या आंदोलन.

    अप्पर तहसील लोणी काळभोर येथे नागरिकांच्या आंदोलन.

    पुणे: कदमवाकवस्ती गावामध्ये पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यासंदर्भात संबंधित प्रशासनाकडून नुकसानग्रस्तांचा पंचनामा देखील करण्यात आला…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *