• April 13, 2026
  • No Comment

अप्पर तहसील लोणी काळभोर येथे नागरिकांच्या आंदोलन.

अप्पर तहसील लोणी काळभोर येथे नागरिकांच्या आंदोलन.

    पुणे: कदमवाकवस्ती गावामध्ये पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यासंदर्भात संबंधित प्रशासनाकडून नुकसानग्रस्तांचा पंचनामा देखील करण्यात आला आहे.परंतु, अद्यापपर्यंत कोणत्याही नागरिकाला नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

    या अन्यायाविरोधात आज अप्पर तहसील कार्यालय लोणी काळभोर समोर आज नागरिकांनी आंदोलन छेडले आहे, व गोर गरिबांना आपल्या हक्काची नुकसान भरपाई मिळवण्यासाठी आज

    अप्पर तहसील कार्यालय, लोणी काळभोर येथे आमरण उपोषण चालू केले आहे.

     

    नुकसानग्रस्त गोरगरीब लोकांना प्रशासनाने पंचनामे करून लवकरात लवकर मदत करावी अशी कदमवाक वस्ती ग्रामपंचायत ने वारंवार तहसील कार्यालया मध्ये पत्र व्यवहार करून कळवले आहे. तरीसुद्धा त्या नागरिकांना प्रशासनाकडून कसल्याही प्रकारची मदत जाहीर केली नाही.

     

    कदमवाक वस्ती ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात अतिवृष्टी होऊन नागरिकांच्या घरात पाणी शिरून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.

    तरी,सर्व नुकसानग्रस्त नागरिक आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हक्कासाठी एकजूट दाखवाली आहे.प्रशासन आता काय भूमिका घेणार हे पाहणे गरजेचे आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *