• April 10, 2026
  • No Comment

मार्केट यार्ड आडते असोसिएशनच्या निवडणुकीचे बिगुल; ३० एप्रिलला मतदान

मार्केट यार्ड आडते असोसिएशनच्या निवडणुकीचे बिगुल; ३० एप्रिलला मतदान

    प्रतिनिधी : सचिन गाडे

    पुणे : मार्केट यार्डमधील फळ, भाजीपाला, केळी, पान तसेच कांदा-बटाटा विभागातील आडत्यांची शिखर संघटना असलेल्या श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड आडते असोसिएशनच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. येत्या ३० एप्रिल रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत मतदान होणार असून, त्याच दिवशी सायंकाळी साडेचार वाजता मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे.
    या निवडणुकीत अध्यक्षपदासह विविध पदांसाठी सर्व मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. अंदाजे ८२० आडते या प्रक्रियेत सहभागी होणार असून, प्रत्येक विभागातील मतदार आपल्या विभागातील उमेदवारांना मतदान करणार आहेत.
    १५ एप्रिल रोजी अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे. १७ ते १९ एप्रिल दरम्यान सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. २० एप्रिल रोजी अर्जांची छाननी होईल, तर २१ ते २३ एप्रिल दरम्यान अर्ज माघारी घेण्याची मुदत देण्यात आली आहे. २४ एप्रिल रोजी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे.
    अध्यक्षांसह भाजीपाला ८, फळे४, केळी व पान विभागातून प्रत्येकी एक आणि कांदा-बटाटा विभागातून चार अशा एकूण १९ संचालकांची निवड या निवडणुकीत होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. तानाजी मांगले काम पाहणार आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *