• April 7, 2026
  • No Comment

गुलटेकडी मार्केट यार्डात तुंबलेल्या ड्रेनेजमुळे घाण पाण्याचा पूर; दुर्गंधीने त्रस्त बाजार

गुलटेकडी मार्केट यार्डात तुंबलेल्या ड्रेनेजमुळे घाण पाण्याचा पूर; दुर्गंधीने त्रस्त बाजार

    प्रतिनिधी : सचिन गाडे

    पूणे : पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात ड्रेनेज लाईन वारंवार तुंबत असल्याने नागरिक, व्यापारी आणि शेतकरी यांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. तुंबलेल्या ड्रेनेजमुळे घाण पाणी थेट बाजार आवारात साचत असून परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे.

    मार्केट यार्डमध्ये राज्यभरातून मोठ्या प्रमाणात फळे आणि भाजीपाला येतो. मात्र साचलेल्या घाण पाण्यामुळे शेतकऱ्यांचा माल खराब होत असून त्यांना आर्थिक फटका बसत आहे. तसेच ग्राहक आणि व्यापाऱ्यांनाही अस्वच्छतेमुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

    या समस्येबाबत अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रारी करूनही अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. ड्रेनेज लाईनची नियमित साफसफाई करावी तसेच नवीन मोठ्या क्षमतेची लाईन टाकावी, अशी मागणी जोर धरत आहे.

    दरम्यान, तज्ज्ञांच्या मते शहरातील ड्रेनेज व्यवस्था अनेक ठिकाणी अपुरी असल्यामुळे पाणी साचण्याच्या समस्या वारंवार निर्माण होतात.

    Related post

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधले

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी…

    मुंबई: दि. १ जुलै : अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संघटनेच्या वतीने आज मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे…
    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *