• April 6, 2026
  • No Comment

महंमदवाडीत टँकरने दुचाकीला दिली धडक; १९ वर्षीय खेळाडू ठार

महंमदवाडीत टँकरने दुचाकीला दिली धडक; १९ वर्षीय खेळाडू ठार

    प्रतिनिधी : सचिन गाडे

    पुणे – भरधाव वेगाने येणाऱ्या पाण्याच्या टँकरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने एका तरुण फुटबॉलपटूचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मोहम्मदवाडी परिसरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी टँकर चालकाला अटक केली आहे.

    ही घटना रविवारी ( दि. 5 ) सायंकाळी वाजण्याच्या सुमारास घडली. मृत तरुणाचे नाव आरिफ शेख (वय १९) असे असून तो कोढवा परिसरातील रहिवासी होता. तो नुकताच १२ वीची परीक्षा देऊन मोकळा झाला होता आणि मित्राला भेटण्यासाठी दुचाकीवरून जात होता.

    मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगात असलेल्या पाण्याच्या टँकरने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर तो रस्त्यावर फेकला गेला आणि गंभीर जखमी झाला. स्थानिकांनी तात्काळ त्याला रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले.

    आरिफ हा एक उत्तम फुटबॉल खेळाडू असून तो स्थानिक तसेच राष्ट्रीय स्तरावर खेळला असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. त्याच्या अचानक मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

    या प्रकरणी टँकर चालक रवींद्र दानाने (वय ३४) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

    Related post

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधले

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी…

    मुंबई: दि. १ जुलै : अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संघटनेच्या वतीने आज मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे…
    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *