नुकतीच घर वापसी केलेली सायली सुर्वे हिचे अपहरण की हत्या

    नुकतीच घर वापसी केलेली सायली सुर्वे हिचे अपहरण की हत्या

    पुणे: नुकतीच घर वापसी करून आलेली हिंदू युवती सायली सुर्वे हिचे तिचा माझी पती आतिफ तासे यांनी अपहरण केलेले आहे. तिचा ठाव ठिकाणाह लागत नाही तिच्यावर प्रचंड दबाव टाकून तिला केस मागे घेण्यासाठी तो प्रयत्न करत आहे. असे तिच्या आईचं म्हणणं आहे. आणि सायली सुर्वेला प्रचंड मारहाण होण्याची किंवा तिच्या खून करण्याची सुद्धा शक्यता आहे. कृपया ताबडतोब याबाबत महाराष्ट्र पोलिसांनी कारवाई केली पाहिजे, जर याबाबतीत काही विपरीत घडलं तर महाराष्ट्रच्या दृष्टीने ते अतिशय निराशा जनक परिस्थिती असेल. असे बोलताना मिलिंद एकबोटे यांनी सांगितले आहे.

     

     

    मोहम्मद आतीफ या तरुणाशी तिने प्रेमविवाह केला होता. पण लग्नाच्या १० वर्षानंतर तिने सगळे अन्याय आणि छळ सांगत हिंदू धर्मात घरवापसी केली होती.

    सायली सुर्वेने २०१९ मध्ये मीरा भाईंदर येथील प्रसिद्ध उद्योजक आतिफ तासे यांच्यासोबत घरच्यांचा विरोध झुगारून प्रेमविवाह केला होता. या विवाहानंतर सायलीचे नाव बदलून अतेजा तासे असे ठेवण्यात आले होते. मात्र लग्नानंतर आपला सतत मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला, तसेच आपले धर्मांतर करण्यात आल्याचा आरोप सायलीने केला आहे.

    व अनेक प्रयत्न केल्यानंतर आपण हिंदुत्ववादी संघटनांच्या संपर्कात आलो आणि त्यांच्या माध्यमातूनच आपले शुद्धीकरण करून पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश देण्यात आल्याचे सायलीने सांगितले होते. पिंपरी चिंचवडमधील सायलीला पुन्हा हिंदू धर्मात घेण्यासाठी धार्मिक विधींसह शुद्धीकरणाची प्रक्रिया पार पाडण्यात आली होती, यामध्ये होम-हवन, मंत्रोच्चार आणि इतर धार्मिक विधी करण्यात आले होते.

    Related post

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधले

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी…

    मुंबई: दि. १ जुलै : अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संघटनेच्या वतीने आज मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे…
    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *