• April 2, 2026
  • No Comment

हडपसरमध्ये धक्कादायक प्रकार; अल्पवयीन मुलीशी छेडछाड, २४ तासांत आरोपी अटकेत

हडपसरमध्ये धक्कादायक प्रकार; अल्पवयीन मुलीशी छेडछाड, २४ तासांत आरोपी अटकेत

    प्रतिनिधी : सचिन गाडे

    पुणे – हडपसर परिसरात अल्पवयीन मुलीवर विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, पोलिसांनी तत्पर तपास करत अवघ्या २४ तासांत आरोपीला अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.
    दिनांक २९ मार्च २०२६ रोजी सकाळी सुमारे ९ वाजता केशव किराणा जनरल स्टोअर्स, राम मंदिराजवळ ही घटना घडली. किराणा सामान खरेदीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीशी एका अज्ञात इसमाने चार्जर मागण्याच्या बहाण्याने जवळीक साधण्याचा प्रयत्न करत तिचा विनयभंग केला.
    या घटनेबाबत हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक २४६/२०२६ अंतर्गत भा.दं.सं. कलम ३५४ तसेच बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO) कलम ८, १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रियांका कोलेवाड यांच्याकडे सोपविण्यात आला.
    तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीची ओळख पटवून त्याला तात्काळ अटक करण्यात आली. आरोपीचे नाव ओमकार बालकृष्ण कोरडे (वय २६, रा. प्रफुल्ल कॉलनी, काळेपडळ, पुणे) असे असून त्याच्याकडून गुन्ह्यावेळी वापरलेले निळे कुर्ता तसेच MH-12-YF-5246 क्रमांकाची दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
    सदर प्रकरणात पोलिसांनी साक्षीदारांचे जबाब नोंदवून ठोस पुरावे गोळा केले असून, जलदगतीने तपास पूर्ण करत २४ तासांच्या आत दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले आहे.
    ही कारवाई पोलीस उपआयुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अतुलकुमार नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) निलेश जगदाळे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक प्रियांका कोलेवाड, हसन मुलाणी तसेच तपास पथकातील कर्मचाऱ्यांनी केली आहे.

    Related post

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधले

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी…

    मुंबई: दि. १ जुलै : अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संघटनेच्या वतीने आज मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे…
    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *