- October 17, 2023
- No Comment
दिवे घाटात वाहन चालकाला लुटणाऱ्या निलेश बनसुडे व त्याच्या 2 साथीदारांवर ‘मोक्का’
पुणे : बंदुकीसारख्या हत्याराचा धाक दाखवून दुचाकीस्वाराला लुटणाऱ्या लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार निलेश बनसुडे व त्याच्या 2 साथीदारांवर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आतापर्यंत 69 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केली आहे
फिर्यादी यांच्या दुचाकीला कट मारुन त्यांच्या गाडीसमोर चारचाकी गाडी लावून तिघांनी शिवीगाळ केली. तसेच एकाने बंदुकीसारख्या हत्याराचा धाक दाखवून फिर्यादी यांच्या खिशातील 1500 रुपये जबरदस्तीने काढून घेऊन निघून गेले. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आयपसी 392,34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 10 जुलै रोजी वडकी येथील पालखी विसावा येथे घडली होती.
दाखल गुन्ह्याचा तपास करुन पोलिसांनी निलेश मल्हारी बनसुडे (वय-26 रा. राजवेली नगर चौक, बनसुडे मळा, इंदापूर), ओम सोमदत्ता तारगावकर (वय-21 रा. महतीनगर, इंदापूर), रोहित मच्छिंद्र जामदार (वय-23 रा. जामदार गल्ली, कसबा पेठ, इंदापूर) यांना अटक केली आहे.
आरोपी निलेश बनसुडे याने संघटित गुन्हेगारांची टोळी तयार करुन स्वत:च्या व टोळीच्या आर्थिक फायद्यासाठी गुन्हे केले आहेत. आरोपींनी मागील दहा वर्षात एकट्याने तसेच टोळी करुन खुन, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, अडवणूक करणे, बेकायदेशीर जमाव जमवणे, बेकायदेशीर हत्यार बाळगणे असे गंभीर गुन्हे केले आहेत. त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. मात्र त्यांनी अशा प्रकारचे गुन्हे वारंवार केले आहेत.लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम3 (1)(ii), 3(2), 3(4) चा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाणयां नी परिमंडळ- 5 पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा यांना सादर केला होता. या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली