• October 17, 2023
  • No Comment

ज्वेलर्सच्या दुकानात मालकाकडून महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग, हडपसर मधील घटना

ज्वेलर्सच्या दुकानात मालकाकडून महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग, हडपसर मधील घटना

    पुणे : ज्वेलर्सच्या दुकानात काम करणाऱ्या एक महिला कर्मचाऱ्यासोबत गैरवर्तन करुन विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दुकान मालकावर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

    याबाबत माळवाडी येथे राहणाऱ्या 20 वर्षाच्या तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. त्यानुसार ज्वेलर्सचे मालक विनोद रमेश कुलकर्णी (वय-36 रा. जॉयनेस्ट सोसायटी, लोणी काळभोर) याच्यावर आयपीसी 354, 354(ड), 509 नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार रविवारी (दि.15) दुपारी तीन आणि सोमवारी (दि.16) सकाळी साडे अकरा वाजता हडपसर येथील ज्वेलर्सच्या दुकानाच्या पहिल्या मजल्यावर घडला.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विनोद कुलकर्णी याचे हडपसरमध्ये ज्वेलर्सचे दुकान आहे.
    फिर्यादी तरुणी ही दुकानात कामाला आहे. रविवारी दुपारी तीनच्या सुमारास पीडित तरुणी दुकानाच्या पहिल्या
    मजल्यावर काम करत होती. त्यावेळी दुकानाचे मालक विनोद यांनी तरुणीला बोलावून घेत तिच्या सोबत गैरवर्तन केले.
    यानंतर सोमवारी सकाळी फिर्यादी या कामावर आल्या असता आरोपीने पुन्हा गैरवर्तन करुन अश्लील हातवारे करुन विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक गोसावी करत आहेत

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *