• October 17, 2023
  • No Comment

महिलेचे बनावट इन्स्टाग्राम अकाउंट तयार करुन मागितली खंडणी

महिलेचे बनावट इन्स्टाग्राम अकाउंट तयार करुन मागितली खंडणी

    पुणे : महिलेचे नाव आणि फोटो वापरून बनावट इन्स्टाग्राम अकाउंट तयार केले. यानंतर महिलेला फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणूक व खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत सेनापती बापट रोड येथे राहणाऱ्या 35 वर्षाच्या महिलेने सोमवारी (दि.16) चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी बनावट अकाउंट तयार करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात आयपीसी 420, 419, 384 सह आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार रविवार (दि.15) ते सोमवार (दि.16) दरम्यान घडला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने स्वत: ची ओळख लवपून फिर्य़ादी यांचे नाव व फोटो वापरून इन्स्टाग्रामवर
    फेक अकाउंट तयार केले. त्यानंतर फिर्यादी यांना त्यांचे फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.
    तसेच त्यांच्याकडे दहा हजार रुपये खंडणी मागितली. आपल्या नावाने फेक अकाउंट तयार केल्याचे लक्षात येताच
    फिर्यादी यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात धाव घेत अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे अंकुश चिंतामण करीत आहेत

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *