• October 27, 2023
  • No Comment

ललित पाटील अन् मैत्रिणीला भेटण्यासाठी फ्लॅटची सोय; संस्थाचालक विनय अरहानाचे कारनामे उघड

ललित पाटील अन् मैत्रिणीला भेटण्यासाठी फ्लॅटची सोय; संस्थाचालक विनय अरहानाचे कारनामे उघड

    पुणे: ड्रग्स माफिया ललित तस्कर याला पोलिसांनी अटक केल्यानंतर आता त्याचे कारनामे उघडकीस येत आहेत. ललित पाटील याला मदत करणाऱ्यांच्या मुसक्या आवळन्यास पोलिसांनी आता सुरवात केली आहे. पुण्यातील संस्थाचालक विनय अरहाना याला पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर त्याचे देखील अनेक कारनामे उघडकीस येत आहेत. ललित पाटील रुग्णालयात उपचार घेत असताना विनय अरहानाने ललित अन् त्याच्या ‘त्या’ मैत्रिणीला भेटण्यासाठी फ्लॅट उपलब्ध करून दिल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान विनय अरहानाला पुणे पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याची रवानगी 4 दिवसांच्या पोलीस कोठडीत करण्यात आली आहे

    पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने काही दिवसांपूर्वी ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळून 2 कोटी 14 लाखांचे ड्रग्ज पकडले होते. तर दोघांना अटक केली होती. पोलिसांच्या तपासात ललित पाटील या गुन्ह्याचा सुत्रधार असल्याचे समोर आले होते. मात्र त्याला अटक करण्यापूर्वीच तो ससून रुग्णालयातून पसार झाला होता. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात भादवी कलम 224, 225 नुसार गुन्हा दाखल आहे.

    याप्रकरणाचा तपास सुरू असताना ललित पाटील याला पळून जाण्यासाठी विनय अरहानाचा वाहन चालक दत्ता डोकेने पळून जाण्यात मदत केल्याचे समोर आले होते. तर डोकेने त्याला पैसे देखील पुरवले होते. डोके याने हे सर्व अरहाना याच्या सांगण्यावरून केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर पोलिसांनी अरहाना याला या गुन्ह्यात ताब्यात घेतले.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *