• December 6, 2023
  • No Comment

पुण्यात तलवारीने गाडीची तोडफोड तलवार घेऊन तरुणांकडून दहशत माजवण्याचे प्रकार पुण्यात सुरूच

पुण्यात तलवारीने गाडीची तोडफोड तलवार घेऊन तरुणांकडून दहशत माजवण्याचे   प्रकार पुण्यात सुरूच

    पुणे : तलवार घेऊन तरुणांकडून दहशत माजवण्याचे प्रकार पुण्यात सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे.पुण्यात तलवारीने गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. पुण्यातील गोखलेनगर परिसरात गुंडांनी दहशत माजवत गाड्यांची तोडफोड केली आहे. या संपूर्ण तोडफोडीता थरारक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत दोन तीन जण थेट गाड्यांची तोडफोड करताना दिसत आहे. त्यांच्या या दहशतीमुळे आणि तोडफोडीमुळे गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
    या प्रकरणी तडीपार असलेला योगेश गायकवाड, मयुर मोरे व त्यांचा एक साथीदार यांच्यावर चतु:र्श्रुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोरे आणि गायकवाडला अटक करण्यात आली असून तिसरा आरोपी शोधण्याचे काम सुरू आहे.
    या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यात रात्रीच्यावेळी सामसूम ठिकणी उभ्या असलेल्या गाड्या थेट फोडताना दिसत आहे. त्यासोबतच व्हिडीओतील हालचाली बघितल्या तर चार ते पाच जण रस्त्यावर दारुच्या नशेत धिंगाणा घालत असल्याचा अंदाज आहे. हे सगळे एकमेकांशी धरपकड करत पसार झाल्याचंदेखील या व्हिडीओत दिसून येत आहे.हा व्हिडीओ घटनास्थळी राहणाऱ्या एका नागरिकाने आपल्या घरातील खिडकीतून काढला आहे

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *