• December 6, 2023
  • No Comment

शेत जमिनीच्या वादातून मध्यप्रदेशातून आणली चार पिस्तुले

शेत जमिनीच्या वादातून मध्यप्रदेशातून आणली चार पिस्तुले

    पिंपरी : शेत जमिनीला आलेला भाव आणि त्यातून निर्माण होणाऱ्या वादातून धुमसत असलेला ‘मुळशी पॅटर्न’ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. मुळशी तालुक्यातील उरावडे-आंबेगाव येथील शेत जमिनीच्या हक्कावरुन सुरू असलेल्या भांडणातून एकाने स्वसंरक्षणासाठी थेट साथीदारासह मध्यप्रदेशात जाऊन चार पिस्तुल आणि दहा काडतुसे आणली. त्यातील दोन पिस्तुले त्याने मित्र आणि नातेवाईकाला दिली.

    पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने चारही जणांच्या मुसक्या आवळल्या. हरीष काका भिंगारे (वय ३४, रा. आंबेडकरनगर, औंध रोड, मूळ – उरावडे, ता. मुळशी), गणेश बाळासाहेब कोतवाल (वय ३०, रा. समर्थनगर, नवी सांगवी), शुभम जगन्नाथ पोखरकर (वय ३०, रा. पाषाण) आणि अरविंद अशोक कांबळे (वय ४२, रा. पौड, ता. मुळशी) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत
    सांगवी परिसरात गस्त घालत असताना युनिट दोनचे सहायक फौजदार शिवानंद स्वामी यांना माहिती मिळाली की, एक व्यक्ती पीडब्ल्यूडी मैदानाजवळ आला असून त्याच्याकडे पिस्तुल आहे. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून हरिष व गणेश यांना ताब्यात घेतले. दोघांच्या अंगझडतीमध्ये कमरेला लावलेली दोन पिस्तुल व पाच जिवंत काडतुसे आढळली. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सहा-सात महिन्यांपूर्वी मध्यप्रदेश येथे जाऊन चार पिस्तुल खरेदी करुन आणल्याचे व दोन पिस्तुल पाषाण येथील मित्र शुभम व पौड येथील नातेवाईक अरविंद यांना दिल्याचे सांगितले
    त्यानुसार, पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दोन पिस्तुल व पाच जिवंत काडतुसे जप्त केली. पोलिसांनी चार जणांकडून चार पिस्तुल व दहा काडतुसे जप्त केली आहेत. आरोपी हरीष भिंगारे हा मूळचा मुळशी तालुक्यातील उरावडे-आंबेगाव येथील रहिवाशी असून त्याचा तेथील स्थानिक व्यक्तीशी शेत जमीनीच्या हक्कावरुन वाद आहे. त्याबाबत त्यांच्यात भांडण झाले होते. त्यामुळे मनात भीती असल्याने हरिषने स्वसंरक्षणासाठी पिस्तुल घेण्याचे ठरविले. हरीष व गणेश हे दोघे मित्र असून त्यांनी मध्यप्रदेशच्या सिमाभागात जाऊन चार पिस्तुल व काडतुसे खरेदी करुन आणले होते

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *