• December 7, 2023
  • No Comment

लग्नास नकार दिल्याच्या रागातून 19 वर्षीय तरुणीला रस्त्यात अडवून मारहाण

लग्नास नकार दिल्याच्या रागातून 19 वर्षीय तरुणीला रस्त्यात अडवून मारहाण

    पुणे : लग्नास नकार दिल्याच्या रागातून 19 वर्षीय तरुणीला रस्त्यात अडवून तिला हाताने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातून समोर आला आहे. पुण्यातील नाना पेठ परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अशा घटनेमुळे पुण्यात मुली सुरक्षित आहेत का?, असा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे.

    ही सगळी घटना पाहून तरुणी घाबरली आणि तिने थेट समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. लग्नासाठी मुलगा विचारत होता मात्र मुलीने नकार दिल्याने त्याने हा प्रकार केल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्रशांत संजय कांबळे या 20 वर्षीय मुलावर गुन्हा दाखल केल आहे.

    आरोपी आणि तक्रारदार मुलगी दोघेही एकमेकांना ओळखत होते. त्यानंतर ओळख वाढत गेली आणि आरोपीने मुलीला थेट लग्नाची मागणी घातली. त्यावेळी मुलीने त्याला लग्नाला नकार दिला होता. याचा राग आरोपीच्या मनात राहिला. या रागातून ही तरुणी नाना पेटेतून जात असताना तिला अडवलं आणि तिचा थेट हात पकडला. तरुणीला कॅम्प चौकात चलण्यास सांगितले असता तिने नकार दिला. यामुळे चिडलेल्या प्रशांत कांबळे याने तरुणीला शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. तसेच तु माझी झाली नाही तर कोणाची होवू देणार नाही, अशी धमकी दिल्याचंही फिर्यादीत नमुद केले आहे.

    रागाच्या भारात तरुणीवर हल्ला…

    काही दिवसांपूर्वी तरुणी भेटत नसल्याच्या कारणाने संतापलेल्या तरुणाने तरुणीवर हल्ला करत तिचं डोके फोडल्याचा प्रकार पुण्यातून समोर आला होता. यामुळे सगळीकडे खळबळ उडाली होती. एकतर्फी प्रेमातून तरुणीचे डोके फोडले असून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. यात 37 वर्षीय महिला जखमी झाली होती. कोरेगाव पार्कमधील बर्निग घाट परिसरात घडली होती. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी तरुणाला अटक केली होती. संकेत शहाजी म्हस्के असं 26 वर्षीय तरुणाचं नाव होतं. आरोपी संकेत आणि 37 वर्षीय महिला हे एकमेकांचे मित्र होते. दोघेही एकाच परिसरात राहायला होते. काही दिवसांपासून दोघांमध्ये भांडणं सुरू असल्याने महिला संकेत सोबत बोलत नव्हती. याचा राग संकेतच्या मनात होता. त्यामुळे संकेतने हल्ला केल होता.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *