• December 7, 2023
  • No Comment

पतीला कामावरुन काढून टाकण्याची धमकी देऊ महिलेवर वारंवार अत्याचार वाघोली परिसरातील घटना

पतीला कामावरुन काढून टाकण्याची धमकी देऊ महिलेवर वारंवार अत्याचार वाघोली परिसरातील घटना

    पुणे : पतीला कामावरुन काढून टाकण्याची धमकी देऊ महिलेवर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा येथील लोकमंगल कारखान्यातील सुपरवायझरवर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 2017 ते 2018 दरम्यान आणि 9 नोव्हेंबर रोजी घडला आहे. आरोपीने पीडित महिलेवर लोहारा आणि वाघोली परिसरातील निर्जन स्थळी अत्याचार केला आहे.

    याबाबत वाघोली येथे राहणाऱ्या 35 वर्षीय महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि.5) फिर्याद दिली आहे. यावरुन अंकुश मन्नु राठोड (रा. जळकोट रामतिर्थ तांडा, उस्मानाबाद) याच्यावर आयपीसी 376/2/एन, 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी महिलेचे पती लोहारा येथील लोकमंगल कारखान्यात कामाला आहेत.
    तर आरोपी महिलेच्या पतीचा सुपरवायझर आहे. त्याने पतीला कामावरुन काढून टाकण्याची व मुलांना मारुन
    टाकण्याची धमकी दिली. तसेच महिलेला हाताने मारहाण करुन जबरदस्तीने
    शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आरोपीने लोहारा आणि वाघोली येथे महिलेसोबत शरीर संबंध ठेवले.
    आरोपीच्या त्रासाला वैतागून महिलेने मंगळवारी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
    महिलेने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
    पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *