• December 14, 2023
  • No Comment

कारचा धक्का लागल्याच्या वादातून तरूणाची हत्या

कारचा धक्का लागल्याच्या वादातून तरूणाची हत्या

    पुण्यात गुन्हेगारी काही संपायचं नाव घेत नाही आहे. त्यात क्षृल्लक कारणावरुन होणाऱ्या वादातून हत्याकेल्याच्या घटनांचादेखील समावेश आहे. अशीच एक घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. कारचा धक्का लागल्याच्या कारणाने झालेल्या वादातून तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे.हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. अभिषेक संजय भोसले (वय 30, रा. शेवाळवाडी, मांजरी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

    कारचा धक्का लागला होता त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर दोघांमध्ये चांगलीच वादावादी झाली. तरुणाला लाथा बुक्क्यांनी मारहाण करत त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. फुरसुंगी ते चंदवाडी रोड रस्त्यावर मंगळवारी रात्री हा हत्येचा थरार पाहायला मिळाला. याप्रकरणी विलास सुरेश सकट, कैलास सुरेश सकट, सचिन सकट (सर्व रा. चंदवाडी, फुरसुंगी) यांच्यासह आणखी 7 – 8 अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *