• December 14, 2023
  • No Comment

तडीपार सराईत गुन्हेगाराला समर्थ पोलिसांनी ठोकल्या बेड्या

तडीपार सराईत गुन्हेगाराला समर्थ पोलिसांनी ठोकल्या बेड्या

    पुणे : तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून शहरात आलेल्या एका सराईत गुन्हेगाराला समर्थ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी ही कारवाई सोमवार पेठेतील एस.व्ही. युनियन गेट जवळ केली. दिपक सुभेदार परदेशी (वय-23 रा. सदाआनंद नगर, सोमवार पेठ, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

    समर्थ पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी हद्दीत पेट्रोलींग करत असताना पोलीस अंमलदार हेमंत पेरणे यांना माहिती मिळाली की, समर्थ पोलीस ठाण्यातील तडीपार गुन्हेगार दिपक परदेशी हा केईएम हॉस्पिटल समोरील बाजुस असलेल्या एस.व्ही. युनियन गेट शेजारी बसला आहे. माहिती मिळताच तपास पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता तो विनापरवानगी शहरात आल्याचे निष्पन्न झाले.

    आरोपी दिपक परदेशी याला पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 यांनी पुणे शहर व संपूर्ण जिल्ह्यातून तडीपार केले होते.
    तडीपारीच्या आदेशाचा भंग करुन आरोपी शहरात आला होता. पोलिसांनी त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. दिपक परदेशी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खुनाचा प्रयत्न , खंडणी , बेकायदेशीर शस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *