- December 14, 2023
- No Comment
आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
पुणे : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. पथकाने बनावट ग्राहक पाठवू खात्री केल्यानंतर, या ठिकाणी छापा टाकून ही कारवाई केली आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून आरोपी पीडित तरुणींकडून वेश्याव्यवसाय करुन घेत होता. ही कारवाई मंगळवारी (दि.12) सायंकाळी सव्वा चारच्या सुमारास बालाजी नगर येथील सृष्टी आयुर्वेदिक मसाज उपचार केंद्र येथे केली आहे.
याप्रकरणी उमेश मल्लपा तराळ (रा. बालाजी हौसींग सोसायटी, बालाजी नगर, पुणे) याच्यावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा 1956 चे कलम 3, 4, 5 व आयपीसी 370 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याबाबत सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस हवालदार अजय नारायण राणे यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
बालाजी नगर येथील ग्रंथ कॉम्प्लेक्सच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या सृष्टी आयुर्वेदिक मसाज उपचार केंद्र
येथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांना मिळाली होती.
आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नावाखाली हा वेश्याव्यवसाय सुरू होता. याप्रकरणी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून या
घटनेची पुष्टी केली आहे. त्यानंतर टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.
आरोपी तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेऊन यातून मिळणाऱ्या पैशांवर
स्वत:ची उपजिवीका भागवत असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप देशमाने करीत आहेत