- December 17, 2023
- No Comment
महाराष्ट्रातील वेगवेगळया जिल्हयात दरोडा व घरफोडया करणाऱ्या आरोपीस युनिट-६ ने केले जेरबंद
पुणे शहरातील जबरी चोरी, घरफोडी व वाहनचोरी या गुन्हयांना आळा बसावा या करीता तीव्र मोहिम
राबवून कारवाई करणेबाबत वरिष्ठ अधिकारी यांनी आदेशित केले होते. हडपसर पोलीस ठाणे गु.र.नं.
१८४२/२०२३ भा.दं. वि. कलम ४५४ ४५७, ३८० या गुन्हयाचा तपास युनिट ६, मार्फत चालू असताना पो.ना. ७३१७
नितिन मुंढे यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्हा हंसराज रणजितसिंग टाक याने
केलेला असून तो कॅनॉल रोड, हडपसर, पुणे येथे येणार आहे. अशी खात्रीशिर माहिती मिळाल्याने मा. रजनीश
निर्मल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट-६, पुणे शहर यांचे आदेशानुसार युनिट कडील अधिकारी व
अंमलदार यांनी सापळा रचून शिताफीने हंजराज ऊर्फ हंसु रणजितसिंग टाक वय १८ वर्षे रा. तुळजाभवानी वसाहत
गाडीतळ, हडपसर, पुणे यास दिनांक १३/१२/२०२३ रोजी ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेऊन दाखल गुन्हयाचे
अनुषंगाने तपास करता प्राथमिक तपासात सदरचा गुन्हा त्याने केल्याची कबुली दिल्याने त्यास दि. १३/१२/२०२३
रोजी अटक करुन त्याची पोलीस कस्टडीची रिमांड घेण्यात आली. रिमांड मुदतीत त्याचेकडे तपास करता त्याने
सदरचा गुन्हा केला असल्याचे सांगून मुद्देमाल काढून देत असले बाबत निवेदन केल्याने त्याचे निवेदना प्रमाणे
गेलो असता आरोपीने सोन्याचे दागिनेंची तसेच रोख रक्कमेची घरफोडी चोरी केल्याची ठिकाणे दाखवून एकुणा
०६,१०,५००/- रु.किं. चे १११ ग्रॅम सोन्याचे दागिने असा मुद्देमाल काढून दिल्याने तो मेमोरंडम पंचनाम्याने जप्त
करण्यात आला आहे त्यामध्ये पो.स्टे कडील एकुण ९ गुन्हे उघडकीस आले आहेत.
नमूद गुन्हयाचा तपास मा. रजनीश निर्मल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट-६, पुणे शहर यांचे
मार्गदर्शनाखाली भैरवनाथ शेळके, पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा युनिट ६, पुणे शहर हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही मा. श्री. रितेशकुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर, मा. श्री. रामनाथ पोकळे, अपर
पोलीस आयुक्त, गुन्हे, मा. श्री. अमोल झेंडे, पोलीस उपआयुक्त, गुन्हे, मा. श्री. सतिश गोवेकर, सहा. पोलीस
आयुक्त, गुन्हे -२, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ६ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रजनीश निर्मल,
पोलीस उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके, सुरेश जायभाय, अंमलदार विठ्ठल खेडकर, नितीन मुंडे, रमेश मेमाणे,
बाळासाहेब सकटे, प्रतिक लाहीगुडे, कानिफनाथ कारखेले, ऋषिकेश व्यवहारे, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार,
नितीन धाडगे, महेंद्र कडु, ज्योती काळे व सुहास तांबेकर यांनी केली आहे.