• February 16, 2024
  • No Comment

पुणे स्टेशनसह पिंपरी चिंचवडमध्ये बॉम्बस्फोट करण्याची धमकी पोलिसांनी काही तासांतच माथेफिरुच्या आवळल्या मुसक्या

पुणे स्टेशनसह पिंपरी चिंचवडमध्ये बॉम्बस्फोट करण्याची धमकी पोलिसांनी काही तासांतच  माथेफिरुच्या  आवळल्या मुसक्या

    पुणे : पुण्यातील शिवाजी नगर आणि पुणे स्टेशनसह पिंपरी चिंचवडमध्ये बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणारा फोन पुन्हा एकदा कंट्रोल रुमला आला. त्यामुळे पुण्यातील या तिन्ही परिसरात मोठी खळबळ उडाली. एका माथेफिरुने ही धमकी दिली होती. पोलिसांनी काही तासांतच या माथेफिरुच्या मुसक्या आवळल्या आहे.

    पुण्यातील शिवाजी नगर आणि पुणे स्टेशनसह पिंपरी चिंचवड परिसर उडवून देईल, असा फोन पुण्यातील कंट्रोल रुमला आला. हा फोन आल्यानंतर पोलीस यंत्रणा कामाला लागली. त्यांनी लगेच तिन्ही परिसरात पाहणी केली मात्र हा धमकीचा कॉल करणारा माथेफिरू असून अफवा पसरवल्याचं पोलीस तापासात उघड झालं. कॉल करणारा व्यक्ती हा हडपसर भागात राहणारा असून तो माथेफिरू असल्याचं पुणे पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. या माथेफिरुने उडवून दिलेल्या अफवेमुळे काहीवेळ चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं.

    पुण्यात यापूर्वीही अनेकदा अशा घटना घडल्या आहेत. त्यात पुणे स्टेशन, विमानतळावर बॉम्ब ठेवल्याचे कॉल्स नियंत्रण कक्षाला आले आहेत. त्यासोबतच बॉम्बने पुणे स्टेशन उडवून देण्याच्या धमक्यादेखील आल्या आहेत. या अशा धमक्यांमुळे संपूर्ण पोलीस पथक कामाल लागतं त्यासोबत बॉम्बशोधक आणि नाशक पथकदेखील कामाला लागतं. मात्र अनेकदा हे फोन आणि धमक्या फेक असल्याचं समोर येतं. त्यामुळे आता या सगळ्या फोन करणाऱ्यांचा तपास करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे

    Related post

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल असा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या लेन्स कार्ड lenskart या कंपनीचा मनसे कडून जाहीर निषेध

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल…

    लोणी काळभोर: लेन्स कार्ड हे विवाद मध्ये सापडले आहे. कंपनीचे सीईओ पियुष बंसल यांनी ग्रुमिंग गाईड असा एक स्टेटमेंट काढले आहे.…
    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी विजय; अध्यक्षपदी गोरख मेंगडे

    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या निधनानंतर झालेल्या हमाल पंचायतच्या त्रैवार्षिक निवडणुकीत गोरख मेंगडे…
    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७ उमेदवार बिनविरोध, केळी विभागातील एका जागेकारिता मतदान.

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डातील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या अध्यक्षपदी सौरभ कुंजीर यांची बिनविरोध निवड…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *