• February 16, 2024
  • No Comment

कोरेगाव पार्क परिसरातील फ्लॅटमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश थायलंड येथील दोन महिलांची सुटका

कोरेगाव पार्क परिसरातील फ्लॅटमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश थायलंड येथील दोन महिलांची सुटका

    पुणे : कोरेगाव पार्क परिसरातील फ्लॅटमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा कोरेगाव पार्क पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत थायलंड येथील दोन महिलांची सुटका करुन महिला स्पा मालकावर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई गुरुवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास कोरेगाव पार्क परिसरातील साऊथ मेन रोड येथील सुखवाणी क्लासिक मधील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नंबर आठ येथे केली आहे.

    मूकडा गेटाईसॉन्ग हीच्यावर आयपीसी 370 सह अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस हवालदार रईसा समीर बेग (वय-38) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
    कोरेगाव पार्क येथील सुखवाणी क्लासिक मधील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची
    माहिती कोरेगाव पार्क पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी ग्राहक पाठवून खात्री करुन घेतली.
    त्यानंतर छापा टाकून थायलंड येथील दोन महिलांची सुटका केली. आरोपीने पीडित महिलांना पैशाचे आमिष दाखवून थायलंड येथून ब्युटी पार्लरचे काम करण्याच्या बहाण्याने बोलावून घेऊन तिच्या फ्लॅटमध्ये ठेवले होते. आरोपी त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करुन घेत होती. यातून मिळणाऱ्या पैशातून स्वत:ची उपजिवीका भागवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे चेतन मोरे करीत आहेत.

    Related post

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल असा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या लेन्स कार्ड lenskart या कंपनीचा मनसे कडून जाहीर निषेध

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल…

    लोणी काळभोर: लेन्स कार्ड हे विवाद मध्ये सापडले आहे. कंपनीचे सीईओ पियुष बंसल यांनी ग्रुमिंग गाईड असा एक स्टेटमेंट काढले आहे.…
    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी विजय; अध्यक्षपदी गोरख मेंगडे

    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या निधनानंतर झालेल्या हमाल पंचायतच्या त्रैवार्षिक निवडणुकीत गोरख मेंगडे…
    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७ उमेदवार बिनविरोध, केळी विभागातील एका जागेकारिता मतदान.

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डातील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या अध्यक्षपदी सौरभ कुंजीर यांची बिनविरोध निवड…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *