- February 16, 2024
- No Comment
जुन्या वादाच्या कारणातून एका युवकावर धारदार शस्त्राने वार आरोपींना अटक
पुणे : जुन्या वादाच्या कारणातून एका युवकावर टोळक्याने हल्ला करुन धारदार शस्त्राने वार केले. तर युवकाला वाचवण्यासाठी आलेल्या दोघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केल्याची घटना कोंढवा परिसरात घडली होती. हा प्रकार 14 जानेवारी रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास कोंढवा येथील समतानगर येथे घडला होता. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी पाच जणांना अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील बेलापुर येथून अटक केली आहे.
शेहबाज मोद्दीन खान (वय-30 रा. कृष्णानगर, मोहंमदवाडी, पुणे), बालाजी तिमन्ना मंगाली (वय-35 रा. येवलेवाडी, पुणे), सुरज राजेंद्र सरतापे (वय-25 रा. चिमटा वस्ती, फातिमानगर, पुणे), जुबेर कुद्दुस कुरेशी (वय-35 रा. कासेवाडी, भवानी पेठ, पुणे), रॉकी ईर्दी अॅन्थोनी (वय-31 रा. वानवडी बाजार, पुणे) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत अमीत जयराम सपकाळ (वय-34 रा. कोहिनुर बी झोन, कमेला कोंढवा खुर्द) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन पोलिसांनी सनी चव्हाण (वय-32), अनिश चव्हाण (वय-35 दोघे रा. समतानगर, कोंढवा रोड), शेहबाज शेख (वय-36 रा. कृष्णानगर) व इतरांवर आयपीसी 307, 326, 324, 143, 144, 147, 148, 149, 323, 34 सह महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी यांचा मित्र झैनुद्दीन शेख उर्फ कल्लू (वय-32) याचे आणि आरोपींमध्ये जुने वाद होते. याच कारणावरुन आरोपी कल्लू याला मारण्यासाठी त्याच्या अंगावर धावून गेले. त्यावेळी फिर्यादी यांनी भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी केली. तर गल्लीतून आलेल्या शेहबाज शेख याने कमरेला लावलेले धारदार हत्यार काढून कल्लूच्या डोक्यात आणि हातावर मारुन गंभीर जखमी केले. त्यावेळी फिर्यादी व त्यांचा मित्र कासीम सय्यद हे कल्लू याला वाचवण्यासाठी गेले असता आरोपींनी त्या दोघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात फिर्यादी अमीत सपकाळ यांच्या डोक्याला व हाताला धारदार हत्यार लागल्याने ते जखमी झाले होते.
दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस अंमलदार सतिश चव्हाण व विशाल मेमाणे यांना माहिती मिळाली की,
आरोपी अकोले तालुक्यातील बेलापुर येथील शेतातील झाडावर मचान बांधुन लपून बसल्याचे समजले.
त्यानुसार पथकाने बेलापुर येथे जाऊन आरोपींना सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडे फरार आरोपी बाबत चौकशी
करुन रॉकी अॅन्थोनी याला राहत्या घरातून अटक केली. आरोपी हे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत