• February 18, 2024
  • No Comment

पोलीस दलात क्रिमिनल इंटेलिजन्स युनिटची स्थापना

पोलीस दलात क्रिमिनल इंटेलिजन्स युनिटची स्थापना

    पुणे : पुण्यातील गुन्हेगारी थांबवण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कंबर कसली आहे. सगळ्या अट्टल गुन्हेगारांती परेड काढल्यानंतर, त्यांना दम दिल्यानंतर पुणे पोलिसांनी आता सगळ्या गुन्हेगारांची प्रत्येक गुन्हेगारांची डिजिटल कुंडली काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता प्रत्येक गुन्हेगारावर पोलिसांनी डिजीटल नजर देखील असणार आहे.
    गुन्हेगारीच्या घटना नियंत्रणात आणून गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी पुणे पोलीस दलात क्रिमिनल इंटेलिजन्स युनिटची स्थापना केली जाणार आहे. पुणे पोलीस दलातील गुन्हे शाखा आणि सायबर शाखेतील कर्मचाऱ्यांना एकत्रित करून या नव्या युनिटीची स्थापना केली जाणार आहे. या अंतर्गत पुणे पोलिसांकडून प्रत्येक गुन्हेगारांची डिजिटल कुंडली काढण्यात येणार आहे.

    पुण्यात नवनियुक्त आयुक्तांनी दोन दिवस सुमारे 500 गुन्हेगारांना एकत्र बोलून त्यांची परेड काढली. त्यांना सज्जड दम दिला. कोणताही गुन्हा करायचा नाही, कोणत्याही गुन्ह्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठींबा द्यायचा नाही, सहभागी व्हायच नाही, गुन्हेगारीच उदात्तीकरण करणारे व्हिडिओ करायचे नाहीत, रिल्स बनवायचे नाहीत, स्टेटस ठेवायच नाही अशा सुचना दिल्या त्यानंतर मात्र रिल्स व्हायरल करणं सुरुच होतं. त्यामुळे आता पोलिसांनी थेट सगळ्या गुन्हेगारांचे सोशल मीडिया अकाऊंट तपासले जाणार आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *