• February 28, 2024
  • No Comment

पिंपरी चिंचवड मध्ये इन्स्टाग्रामवरील मित्राला भेटण्यासाठी बोलवून लुटले

पिंपरी चिंचवड मध्ये इन्स्टाग्रामवरील मित्राला भेटण्यासाठी बोलवून लुटले

    पिंपरी : समाजमाध्यमातील ‘इंस्टाग्राम’वरून मैत्री झालेल्या तरुणीने तरुणाला संदेश करून भेटायला बोलाविले. त्यानंतर तरुणाचा मोबाइल फोन घेऊन तरुणी पळून गेल्याची घटना पिंपरीत घडली.याप्रकरणी २१ वर्षीय तरुणाने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तरुणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी तरुणीने फिर्यादी तरुणाला इंस्टाग्रामवर संदेश पाठविला. त्याला पिंपरीत भेटायला बोलाविले. पिंपरीत दोघांची भेट झाली
    तिथे तरुणीने तरुणाकडे त्याचा फोन मागितला. मात्र फोन देण्यास तरुणाने नकार दिला. त्यावरून तरुणीने ‘तू तुझा मोबाईल दे नाही तर मी आरडाओरडा करून लोकांना तू माझी छेड काढतो असे सांगेल’. माझ्या मित्रांना बोलावून घेऊन तुला मारायला सांगेल’ अशी धमकी दिली. तरुणाच्या खिशातून ४५ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन तरुणीने जबरदस्तीने काढून नेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *