• February 28, 2024
  • No Comment

सासवड परिसरात कांद्याच्या शेतीत अफूची लागवड गुन्हे शाखेने कारवाई दोघांना अटक

सासवड परिसरात कांद्याच्या शेतीत अफूची लागवड गुन्हे शाखेने कारवाई दोघांना अटक

    पुणे : सासवड परिसरातील कोडित गावात कांद्याच्या शेतीत अफूची लागवड करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने कारवाई करून दोघांना ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी दहा किलो ५०० ग्रॅम वजनाची अफूची बोंडे जप्त करण्यात आली.

    याप्रकरणी दशरथ सीताराम बडदे (वय ६५), तानाजी निवृत्ती बडदे (वय ६९, रा. कोडित, ता. पुरंदर, जि. पुणे) यांच्याविरुद्ध सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून दहा किलो ५०० ग्रॅम वजनाची अफूची बोंडे जप्त करण्यात आली असून, जप्त केलेल्या अफूच्या बोंडाची किंमत २१ हजार रुपये आहे. पुरंदर तालुक्यातील कोडित गावात कांदा शेतीत बडदे यांनी अफूची लागवड केल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना मिळाली.

    त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. तेव्हा अफूची लागवड न दिसण्यासाठी बडदे यांनी कांदा आणि शेवंतीच्या फुलांची लागवड केल्याचे आढळून आले. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त अधीक्षक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी, सहायक निरीक्षक राहुल गावडे, सचिन घाडगे, अजित भुजबळ, विजय कांचन, योगेश नागरगोजे, धीरज जाधव, दगडू वीरकर, सूरज नांगरे यांनी ही कारवाई केली. बडदे यांना सासवड न्यायालयात हजर करण्यात आले. दोघांना न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *