• February 28, 2024
  • No Comment

मेफेड्रोन तस्करी प्रकरणात पुणे पोलिसांकडून बंगालमधील मालदा येथून एकाला अटक

मेफेड्रोन तस्करी प्रकरणात पुणे पोलिसांकडून बंगालमधील मालदा येथून एकाला अटक

    पुणे : मेफेड्रोन तस्करी प्रकरणात पुणे पोलिसांच्या पथकाने पश्चिम बंगालमधील मालदा येथून एकाला ताब्यात घेतले. अमली पदार्थ तस्कर संदीप धुनिया याच्या संपर्कात पश्चिम बंगालमधील संशयित आरोपी असल्याचे आढळून आले आहे. सुनील बर्मन असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. बर्मनला अद्याप याप्रकरणात अटक करण्यात आली नसून, त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली. या प्रकरणात सात आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यात येत आहे. बर्मन फरार आरोपींपैकी एक असल्याचे सांगण्यात आले.

    पुणे पोलिसांनी पुणे, कुरकुंभ, दिल्ली येथे छापे टाकून मेफेड्रोन तस्करी उघडकीस आणली. पोलिसांनी तीन हजार ७०० कोटी मेफेड्रोन जप्त केले. याप्रकरणी सातजणांना अटक करण्यात आली असून मुख्य सूत्रधार संदीप धुनिया असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
    धुनिया हा मुंबईतील एकाच्या संपर्कात होता. तो नेपाळमार्गे कुवेतला पसार झाला आहे. पश्चिम बंगालमधून ताब्यात घेण्यात आलेला बर्मन पुण्यात येऊन गेल्याचे उघडकीस आले आहे. तो अन्य आरोपींच्या संपर्कात असल्याची माहिती पोलिसांनी दिली

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *