- February 28, 2024
- No Comment
हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल स्पाईस फॅक्टरी आणि हॉटेल सी डॉक या दोन हॉटेलमध्ये हुक्काबारवर पोलिसांचा छापा
पिंपरी : हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल स्पाईस फॅक्टरी आणि हॉटेल सी डॉक या दोन हॉटेलमध्ये विनापरवाना सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाई 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी (दि.26) रात्री करण्यात आली आहे.
हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाकड येथील कस्तुरी चौका जवळ असलेल्या हॉटेल सी.डॉक येथे हुक्काबार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याठिकाणी कारवाई करुन 33 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार चंद्रकांत शंकर गडदे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार किशोर दिलीप काटे (वय 38, रा. केशवनगर, पिंपळे सौदागर), अक्षय प्रभाकर कलाटे (वय 28, रा. विनोदेवस्ती, वाकड), दिनेश सुरेश काटे (रा. पिंपळे सौदागर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी कारवाई वाकड येथील व्हाईट स्क्वेअर बिल्डींग मधील हॉटेस स्पाईस फॅक्टरी येथे करण्यात आली.
पोलिसांनी छापा टाकून लोखंडी बार्बेक्यू इलेक्ट्रिक शेगडी, कोळसा, हुक्का साहित्य असा एकूण 15 हजार 800 रुपयांचा
ऐवज जप्त केला. याप्रकरणी पोलीस अंमलदार दत्तात्रय उत्तम शिंदे (वय-32) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन तानाजी सयाजी देसाई (वय-28 रा. पारखे वस्ती, वाकड मुळ रा. मु.पो. कोरेवडे, ता. आजरा, जि. कोल्हापूर), हॉटेल मालक स्वप्नील डांगे (रा. पारखे वस्ती, वाकड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गोमारे करीत आहेत.
हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये बेकायदेशीर हुक्काबार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार माहिती प्राप्त करुन हॉटेल सी.डॉक व हॉटेल स्पाईस फॅक्टरी येथे छापा टाकून 49 हजार 400 रुपयांचा
मुद्देमाल जप्त केला आहे. या ठिकाणी हुक्का पार्लर चालवण्याची कोणतीही परवानगी न घेता तसेच कोणत्याही
प्रकारची खबरदारी न घेता ग्राहकांना हुक्का पुरवला जात होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे