• February 28, 2024
  • No Comment

पिंपरी- चिंचवड पोलिसांनी बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा केला पर्दाफाश सहा जणांना अटक

पिंपरी- चिंचवड पोलिसांनी बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा केला पर्दाफाश सहा जणांना अटक

    पुणे : पुणे शहरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. आयटी डिप्लोमा झालेल्या तरुणांनी गुन्हेगारी सुरु केली. व्यवसायात जम बसला नाही, त्यामुळे त्यांनी बनावट नोटांचा कारखाना सुरु केला. आता पिंपरी- चिंचवड पोलिसांनी बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय. या प्रकरणात सहा जणांना पुणे पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. ऑफसेट मशीनवर बनावट नोटा छापत होते. ही नोट हुबेहुब त्यांनी तयार केली. एकूण ७० हजार रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत
    पुणे शहरातील सहा तरुणांनी व्यवसाय सुरु केला. त्यामध्ये एक जण आयटीमध्ये डिप्लोमा केलेला युवक आहे. या युवकांनी नवीन प्रिंटिंग प्रेस घेतले. त्यानंतर छापाईचा व्यवसाय सुरू केला. व्यवसायात मंदी आली. त्यांचा व्यवसाय चालू लागला नाही. त्यानंतर चीनमधून ऑनलाइन बनावट नोटा छापण्यासाठी कागद मागवला. त्या कागदावर 500 रुपयांच्या बनावट नोटा छापण्यास सुरुवात केली. 70 हजारांच्या नोटाही त्यांनी छापल्या. त्या विकत असताना देहूरोड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आणि अवघ्या टोळीचा पर्दाफाश झाला.

    सहा जणांना अटक
    पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. या लोकांनी आयटी डिप्लोमा केला होता. आरोपींकडून सत्तर हजारांच्या बनावट नोटा जप्त केल्यात. या लोकांनी अजून नोटा चलनात आणल्या की नाही, त्याचा शोध पुणे पोलीस घेत आहेत. या टोळीची पायमुळं आणखी किती खोलवर आहेत याचा तपास पोलीस करतायत या प्रकरणात या टोळीला कोणाची मदत झाली, त्यांनी हुबेहुब नोटा कशा तयार केल्या, यासंदर्भात तपास पोलिसांनी सुरु केली आहे

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *