- December 5, 2024
- No Comment
पुण्यातील धक्कादायक घटना वडिलांना टकल्या बोलला म्हणून तरुणाने केली एका व्यक्तीची हत्या
पुणे : दारू पिताना वडिलांना टकल्या बोलला म्हणून राग अनावर होत मित्राचा दगडाने ठेचून खून केला. ही धक्कादायक घटना काल बुधवारी दि.४ रोजी दुपारी दीडच्या सुमारास घडली. मद्याच्या नशेत असलेल्या एका व्यक्तीने वडिलांना टकल्या म्हटल्याचा राग आल्याने अल्पवयीन तरुणाने हे कृत्य केले. राजू लोहार (४६, रा. दरेकर वस्ती, वाघोली) असे खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. तर १६ वर्षीय अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी मयत राजू यांचा मुलगा राज लोहार याने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुलगा आणि मयत दोघेही एकमेकांच्या ओळखीचे आहे. वाघोलीतील दरेकर वस्ती परिसरात ते राहतात. दरम्यान, बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास दोघेही मद्यप्राशन करत बसले होते. यावेळी त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. मयत राजू लोहार यांनी आरोपीला उद्देशून ”तुझा बाप टकल्या आहे” असे म्हटले. याचाच राग आल्याने आरोपी अल्पवयीन तरुणाने राजू लोहार यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. शेजारीच पडलेला भला मोठा दगड उचलून आधी त्यांच्या पाठीत आणि नंतर छातीत मारला. दगडाचा घाव वर्मी लागल्याने राजू लोहार यांचा मृत्यू झाला