- December 5, 2024
- No Comment
हे शहर विद्येचं माहेर आहे की गुन्ह्यांचं पुण्यात गेल्या तीन दिवसांमध्ये शहरात चक्क 5 खून
तीन दिवसात पुणे शहरात खुनाचे 5 प्रकार
विद्येचं माहेर अशी ख्याती असलेल्या पुणे शहरात गेल्या काही काळापासून गुन्ह्यांच्या घटनाच जास्त वाढायला लागल्या आहेत. मे महिन्यात झालेलं पोर्श ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरण असो किंवा त्यानंतर काही महिन्यांनी झालेलं वनराज आंदेकर खून प्रकरण. शहरात गुन्ह्यांच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली असून त्यामुळे सामान्य नागरिकांचा जीव मात्र धोक्यात आला असून ते जीव मुठीत धरून जगताना दिसत आहेत. शुल्लक कारणावरून वादावादी, भांडण, खून, मारामाऱ्या अशा अनेक घटना घडत असून कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
हे शहर विद्येचं माहेर आहे की गुन्ह्यांचं असा प्रश्न पडावा अशा काही घटना पुण्यात घडल्या असून गेल्या तीन दिवसांमध्ये शहरात चक्क 5 खून झाले आहेत. त्यामुळे प्रचंड खळबळ माजली असून नागरिकांमध्येही भीतीचं , दहशतीचं वातावरण आहे.