- December 5, 2024
- No Comment
पोलिसांत भरती करून देतो, आमिष दाखवत तरुणीवर अत्याचार
पोलिसांत भरती करून देतो, असे आमिष दाखवत एका तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना उजेडात आली आहे. २३ वर्षीय पिडीत तरुणीने आंबेगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. त्यांची चार वर्षांपूर्वी ओळख झाली होती.आरोपीने या तरुणीला पोलीस दलात भरती करून देण्याचे आमिष दाखवले होते. तिला गोड बोलून भूलथापा देण्यात आल्या. तसेच, वेळोवेळी पोलीस भरतीच्या आमिषाने तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यात आल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
या तरुणीने आरोपीकडे पोलीसभरतीबाबत विचारणा केली. त्यावेळी त्याने तिला जिवे मारण्याची धमकी दिली. पीडितेला मानसिक आणि शारीरिक त्रास देण्यास सुरुवात केली. आरोपीच्या या जाचाला कंटाळून तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. तिच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक प्रियांका गोरे करीत आहेत.