• December 11, 2024
  • No Comment

भांडणाचा राग मनात धरुन टोळक्याने तरुणावर कोयत्याने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न!आरोपीवर व ५ साथीदारांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

भांडणाचा राग मनात धरुन टोळक्याने तरुणावर कोयत्याने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न!आरोपीवर व ५ साथीदारांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

पुणे: आदल्या दिवशी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन टोळक्याने तरुणावर कोयत्याने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी विठ्ठल दोलत गुट्टे (वय २४, रा. निळे गल्ली, मरकळ रोड, आळंदी) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी नागेश बालाजी कांबळे (वय १९, रा. गायकवाड वस्ती, कुरुळी,

ता. खेड), अदित्य तुकाराम सातपुते (वय २२, रा. कुन्हाडे वस्ती, वडगाव रोड, आळंदी) आणि विश्वजजित दामोदर कदम (वय २०, रा. आळंदी) यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर महेश पितळे व त्याच्या इतर ५ साथीदारांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना आळंदी येथील मोकळया मैदानात रविवारी सायंकाळी ७ वाजता घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश पितळे व त्यांच्या सोबतच्या ५ ते ६ मुलांनी रात्री झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन महेश पितळे याने तुला आता जिवंत ठेवत नाही असे म्हणून फिर्यादी यांच्या क्या कोयता मारत होते. त्याचवेळी फिर्यादी यांनी दोन्ही हात मध्ये घातल्याने कोयत्याचा वार त्यांच्या दोन्ही हातावर झाला. महेश पितळे याच्याबरोबर असलेल्या साथीदाराने त्यांच्याकडील कोयत्याने वार केला.

तो वार चुकवत असताना कोयता उजव्या गालावर वार झाला. इतरांनी फिर्यादीला खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांना सोडविण्यासाठी फिर्यादीचे मेव्हणे बालाजी लिंबोळे यांच्या पाठीमागून महेश याने कोयत्याने पाठीत वार केला. पोलिसांनी टोळक्यामधील तिघांची नावे निष्पन्न करुन त्यांना अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक माळी तपास करीत आहेत.

Related post

चरस, गांजाची विक्री करणारा टोळका जेरबंद, अंमली पदार्थ विरोधी पथकाची उल्लेखनीय कामगिरी, चव्वेचाळीस लाखाचा माल हस्तगत

चरस, गांजाची विक्री करणारा टोळका जेरबंद, अंमली पदार्थ विरोधी…

पुणे : कात्रज परिसरातून चरस, गांजाचा मोठा साठा जप्त; अंमली पदार्थांच्या विक्रीसाठी आलेल्या अरुण अरोराकडून 44 लाखाचा माल हस्तगत कात्रज: अंमली…
फरार अट्टल गुन्हेगार व त्याच्या साथीदारांवर मोक्का कारवाई,वारजे माळवाडी पोलिसांची लोणावळ्यात कारवाई

फरार अट्टल गुन्हेगार व त्याच्या साथीदारांवर मोक्का कारवाई,वारजे माळवाडी…

वारजे: जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्ह्यात पोलिसांनी आरोपी सह साथीदारांवर मोक्का कारवाई केली. त्यातून तो जामीनावर सुटल्यानंतरही त्याची गुन्हेगारी थांबत…
पिंपरी-चिंचवडमध्ये कंपनीला भीषण आग; आगीचे कारण अजुन अस्पष्ट

पिंपरी-चिंचवडमध्ये कंपनीला भीषण आग; आगीचे कारण अजुन अस्पष्ट

भोसरी: पिंपरी-चिंचवडच्या भोसरी एमआयडीसी परिसरात प्लास्टिक आणि रबर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग लागली आहे. संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास आग लागल्याची माहिती अग्निशमन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *