- December 19, 2024
- No Comment
पिंपरी: कुदळवाडीतील अनधिकृत बांधकामांवर हातोडा

पिंपरी: महापालिका क क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत येणा-या मोरे पाटील चौक ते कुदळवाडी पोलीस चौकी पर्यंत १८ मीटर रुंद डीपी रस्ता (३०० मीटर लांबी) व कुदळवाडी पोलीस चौकी ते विसावा चौक या ३० मीटर रुंद ५५० मीटर लाबींच्या डीपी रस्त्याच्या दोन्ही बाजुला असणारे सुमारे ९००० चौरस मीटर क्षेत्रातील ३० आरसीसी बांधकामे, सुमारे ४००० चौरस मीटर क्षेत्रातील ४५ वीट बांधकामांसह पत्राशेडवर कारवाई करण्यात आली.
महापालिका प्रभाग क्रमांक २ चिखली, कुदळवाडी परिसरातील एकूण १३००० चौरस मीटर आरसीसी बांधकामे व पत्राशेडवर २ पोकलेन, २ जेसीबी व २ मालवहू ट्रक यांच्या सहाय्याने अतिक्रमण निष्कासनाची कारवाई करण्यात आली. तसेच, क, इ व फ क्षेत्रीय कार्यालयाकडील अतिक्रमण पथक, ५६ महाराष्ट्र सुरक्षा बल जवान, स्थानिक पोलिस स्टेशन चिखलीमधील बंदोबस्तात १२ अधिकारी, कर्मचारी तसेच महाराष्ट्र पोलीस अधिकारी, कर्मचारी सहभागी होते.
मंजूर विकास आराखड्यातील रस्ते विकसित करण्यासाठी गुरुवारी (दि. १९) अतिक्रमण निष्कासनाची कारवाई सुरु राहणार आहे. दररोज शहराच्या विविध भागात अतिक्रमण कारवाई केली जात आहे, महापालिका आयुक्त यांच्या निर्देशनानुसार ही कारवाई केलेल्या ठिकाणी पालिका परवानगी घेतल्याशिवाय अनधिकृत पत्राशेड, बांधकाम करु नये, अशा सुचना देण्यात आल्या आहेत.