• December 20, 2024
  • No Comment

6 लाखांवर 55 लाख दिले तरी मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी, हडपसरमधील सावकार गोत्यात

6 लाखांवर 55 लाख दिले तरी मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी, हडपसरमधील सावकार गोत्यात

    पुणे : सॉफ्टवेअर कंपनी दिवाळखोरीत गेल्याने देणी भागविण्यासाठी सावकाराकडे १० लाख रुपये मागितले. त्याने बँकेतून ८ लाख काढले, २ लाख व्याज म्हणून कापून घेतले.

    ६ लाख हातावर टेकवले. एटीएम कार्ड काढून घेतले. दर महिन्याला जमा होणारा पगार तो काढून घेत होता. ५५ लाख रुपये दिल्यानंतरही आणखी पैसे मागत जीवे ठार मारुन टाकण्याची धमकी दिल्याने शेवटी तरुणाने पोलिसांकडे धाव घेतली.

    याबाबत भुकूम येथील एका ४७ वर्षाच्या नागरिकाने पौड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी रवि नरसिंग पवार Ravi Narsingh Pawar (रा. हडपसर) व त्यांच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १० ऑगस्ट २०२३ ते १७ डिसेंबर २०२४ दरम्यान घडला.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सध्या खराडी येथील एका कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करीत आहेत. त्यांनी २०१८ मध्ये एक सॉफ्टवेअर कंपनी काढली होती. ती दिवाळखोरीत निघाल्यामुळे त्यांनी गावाकडील शेती विकून कंपनीची काही देणी भागविली. पैसे शिल्लक नसल्याने त्यांनी मित्रांकडे पैसे मागितले. पण कोणी त्यांना पैसे दिले नाहीत.

    एकाच्या ओळखीतून रवि पवार याच्याकडे १० लाख रुपये मागितले. त्याने बँकेतून ८ लाख रुपये काढले. पण, फिर्यादीच्या हातात फक्त ६ लाख रुपये दिले. २ लाख रुपये व्याज म्हणून काढून घेतले. दुसर्‍या दिवशी रवि पवार याने सांगितले की, दर महिना मी मागेल तेवढे पैसे मला द्यायचे. तू वेळेवर देशील याची खात्री नाही. तु तुझे एटीएम कार्ड दे, ज्या दिवशी तुझा पगार येतो, ते एटीएममधून काढून घेईन. पैसे फिटले की तुला कार्ड परत करेल, असे म्हणून तो कार्ड घेऊन गेला. त्यानंतर त्याने व त्याच्या नातेवाईकांनी वेळोवेळी हजारो रुपये काढले. त्याच्या सांगण्यावरुन फिर्यादी यांनी अनेकांच्या खात्यात पैसे पाठविले.

    अशा प्रकारे ६ लाखांच्या बदल्यात वेळोवेळी ५५ लाख ७१ हजार रुपये दिले. तरी वेळेवर पैसे देता आले नाही म्हणून रवि पवार याने फिर्यादीला मगरपट्टा येथे बोलावून घेतले. त्याने व त्याच्या चार साथीदारांनी हाताने मारहाण केली. मी सांगतो तेवढे पैसे दिले नाहीत तर तुला व तुझ्या कुटुंबाला जीवे ठार मारेल, अशी धमकी दिली. त्यामुळे फिर्यादी यांनी घाबरुन पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दिली आहे.

    पुढील तपास पोलीस निरीक्षक संदिप चव्हाण तपास करीत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *