• December 20, 2024
  • No Comment

ताम्हिणी घाटात मोठा अपघात, 5 ठार 25 लोक जखमी

ताम्हिणी घाटात मोठा अपघात, 5 ठार 25 लोक जखमी

ताम्हिणी घाटातील एका धोकादायक वळणावर, वॉटरफॉल पॉईंटजवळ बसचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

यामध्ये 5 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 25 लोक जखमी झाले. त्यांना तातडीने माणगाव ग्रामीण रुग्णालयातच हलवून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आली आहेत. लग्नासाठी ही बस पुण्याहून महाडच्या दिशेने जात असताना घाटात हा भीषण अपघात झाला. त्यावेळी बसमध्ये 40 हून अधिक प्रवासी होते, अशी माहिती समोर आली आहे. बसमध्ये आणखी काहीण जण अडकल्याची भीती व्यक्त होत असून बचाव पथकाचे अधिकारी आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील लोहगाव येथून जाधव कुटुंब हे महाड येथील बिरवाडी येथे बसमधऊन लग्नसमारंभासाठी खासगी बसने जात होते. purple ट्रॅव्हल्सची खाजगी बस (क्रमांक.MH14GU3405) ही रस्त्यावरून जात असताना ताम्हिणी घाटात वॉटरफॉल पॉईंटजवळ धोकादायक वळणावर बस ड्रायव्हरचे नियंत्रण सुटले आणि बसचा भीषण अपघात झाला. ही गाडी पूर्णपणे पलटी झाली आणि पाच जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये 2 पुरूष आणि 3 महिलांचा समावेश आहे.

संगीता धनंजय जाधव , गौरव अशोक दराडे, शिल्पा प्रदीप पवार आणि वंदना जाधव अशी मृतांची नावे असून पाचव्या मृत पुरूषाची ओळख अजून पटलेली नसल्याने त्याचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. अपघातात 25 लोक जखमी असून काही जण बसमध्येही अडकले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

पोलिसांची कारवाई:

या अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांनी त्यांच्या टीमसह घटनास्थळी धाव घेतली. बचावकार्य तातडीने सुरू करण्यात आले असून पोलीस, रेस्क्यू टीम, आणि वैद्यकीय मदत घटनास्थळी दाखल झाली आहे. जखमींवर माणगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांकडून या अपघाताप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Related post

गुंठेवारी खरेदी-विक्रीचा मार्ग मोकळा! ५ टक्के शुल्क भरा अन्‌ गुंठेवारी खरेदी-विक्रीस मिळवा परवानगी; आसा करा अर्ज

गुंठेवारी खरेदी-विक्रीचा मार्ग मोकळा! ५ टक्के शुल्क भरा अन्‌…

सर्वसामान्‍य नागरिकांनी खरेदी केलेल्‍या एक, दोन, तीन किंवा चार-पाच गुंठे क्षेत्राचे तुकडे नियमित करण्‍यास प्रांताधिकाऱ्यांकडून मान्यता दिली जात आहे. त्यासाठी पूर्वी…
तुमचं वीजबील जास्त येतंय? करा हा उपाय!

तुमचं वीजबील जास्त येतंय? करा हा उपाय!

तुमची वीजबिले कधी कल्पनेपेक्षा जास्त आली आहेत का? वीज वाचवत असूनही जास्त बिल येत असेल तर तुमच्या वीजमीटरमध्ये काहीतर गडबड किंवा…
महावितरणची लकी ड्रॉ डिजिटल ग्राहक योजना

महावितरणची लकी ड्रॉ डिजिटल ग्राहक योजना

महावितरणने ऑनलाइन वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढवण्याच्या हेतूने लकी ड्रॉ डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी 31 मार्च 2024…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *