- December 20, 2024
- No Comment
सर्राइत मोबाईल शॉपी फोडणारे बिहारी पकडले; ६५ मोबाईल हस्तगत
पुणे: धनकवडी चव्हाण नगर कमानी जवळ असलेली मोबाईल शॉपी फोडून असंख्य मोबाईल चोरून न्नेणारे बिहारी चोरते सहकारनगर पोलिसांनी पकडले असून त्यांच्याकडून ६५ मोबाईल आतापर्यंत हस्तगत करण्यात आले आहेत.
आंतरराज्यातील घरफोडी करणा-या टोळीकडुन जप्त केलेले १७,८२,४७९ /- रु. किं. चे. विविध कंपनीचे एकुण ६५ मोबाईल फोन पोलीस आयुक्त अमितेश कुमार र यांचे हस्ते फिर्यादी यांना परत करण्यात आले.
दि.१४/०७/२०२४ रोजी फिर्यादी यांचे चव्हाणनगर कमानी शेजारी असलेले मोबाईल शॉपी दुकानाचे शटर उचकटुन आतमध्ये प्रवेश करुन अज्ञात चोरट्याने मोबाईल फोन चोरुन नेले होते. त्याबाबत सहकारनगर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं २४६/२०२४ भा. न्या. संहिता कलम ३०५, ३३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचे तपासात घरफोडीतील आरोपी नामे १) मोबीन मुन्ना देवान वय ३६ वर्षे रा. बिरता चौक बसननगर, ठाणा घोडासन राज्य बिहार २) अरुण किशोरी सहा वय ५२ वर्षे रा. वार्ड नं १७ मोतीहारी मठिया डीह , ठाणा छतावणी राज्य बिहार ३) शमसाद आलम सरजउल अन्सारी वय ३६ वर्षे रा. अठमुहाण जिल्हा मोताहारी ठाणा झादौखद राज्य बिहार यांना ताब्यात घेवुन सहकारनगर पोलीस स्टेशन कडील दाखल गुन्ह्यात अटक करुन सदर आरोपीकडुन एकुण १७,८२,४७९/- रु.कि.चे. विविध कंपनीचे एकुण ६५ मोबाईल फोन जप्त केले आहेत. सदरचे मोबाईल फिर्यादी यांना पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. अमितेश कुमार यांचे हस्ते परत केले आहेत.