• December 20, 2024
  • No Comment

तुम्ही घरामध्ये किती कॅश ठेवू शकता; नियम लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस येईल

तुम्ही घरामध्ये किती कॅश ठेवू शकता; नियम लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस येईल

    कॅश ट्रांजेक्शनमुळे बऱ्याच व्यक्तींच्या घरातील तिजोरीमध्ये भरपूर पैसे जमा करून ठेवलेले असतात. परंतु इन्कम टॅक्सने कोणत्याही व्यक्तीच्या घरामध्ये पैशांची किती लिमिट असावे याचे नियम बनवले आहेत. तुम्ही तुमच्या घरात किती लिमिटपर्यंत पैसे साठवून ठेवू शकता हे जाणून घ्या. त्याचबरोबर लिमिट बाहेर पैसे जमा झाले असतील आणि ही गोष्ट इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला कळाली तर, तुमच्या घरात रेड पडू शकते. त्यामुळे cash limit at home च्या लिमिटविषयी संपूर्ण माहिती जाणून घ्या.

    घरात पैसे ठेवण्याचा नियम काय सांगतो :

    तसं पाहायला गेलं तर घरामध्ये पैसे साठवून ठेवण्याची कोणतीही लिमिट बनवली गेली नाहीये. परंतु तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल तर तुम्ही तुमच्या घरात कितीही पैसे जमा करून ठेवू शकता. परंतु या पैशांचा काहीतरी सोर्सच नाही देखील गरजेचे आहे. म्हणजेच तुमच्या घरामध्ये कोणत्या माध्यमातून पैसा येत आहे या गोष्टीची पुरेपूर खबरदारी तुम्हाला घ्यावी लागेल.

    तुमच्याकडे जास्त पैसे आहेत हे समजल्यावर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला तुमच्या अर्निंग सोर्स बद्दलची सर्व कागदपत्रे आणि पुरावे दाखवावे लागतील.

    कधी होऊ शकते तुमच्यावर कारवाई :

    समजा तुम्ही जाचपडताळणी एजन्सीला कोणत्याही प्रकारच्या अर्निंग सोर्स बद्दलचे पुरावे देऊ शकला नाही तर, तुम्ही फार मोठ्या अडचणीत येऊ शकता. तुम्ही किती टॅक्स भरले आहेत याबाबतची संपूर्ण माहिती आयकर विभागाला दिली जाते आणि आयकर विभागाकडून झालेल्या पडताळणीमध्ये अनडिक्लेअर कॅश समोर आल्यावर तुमच्यावर योग्य ती कारवाई देखील केली जाते. त्याचबरोबर तुमच्याकडून अघोषित रक्कमेतील 137% टॅक्स वसूल देखील केले जातात.

    पैशांच्या बाबतीत नियम जाणून घ्या :

    त्याचबद्दलच्या या नियमाबद्दल फार कमी व्यक्तींना ठाऊक आहे. ते म्हणजे तुम्ही तुमच्या खात्यातून 50,000 रुपयांची रक्कम काढून घेत असाल तर, तुम्हाला तुमचं पॅन कार्ड दाखवावे लागेल. त्याचबरोबर आयकर कलम 194 एन अंतर्गत एखाद्या व्यक्ती एकाच वर्षात 20 लाखांपेक्षा जास्त रक्कम काढत असेल तर, त्याच्याकडून टीडीएस कापला जातो. ही गोष्ट देखील जाणून घ्या की, हा नियम केवळ त्या लोकांसाठी आहे ज्यांनी 3 वर्षांपेक्षा जास्त दिवस आयकर परतावा भरला नसेल.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *