- December 22, 2024
- No Comment
मुंबई मेट्रोमध्ये थेट भरती, परीक्षेची गरज नाही; २ लाखांपर्यंत मिळेल पगार, असा करा अर्ज
मुंबई शहरात तसेच MMR विभागामध्ये ठिकठिकाणी मेट्रोची कामे सुरु आहेत. भविष्यामध्ये शहरात मेट्रोचे विशाल जाळे तयार होणार आहे. यामुळे अनेक उमेदवारांना रोजगाराची संधी निर्माण होणार आहे.
मुळात, या गोष्टीला प्रारंभही झाला आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये विविध पदांसाठी भरतीप्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी असणार आहे. या पदांवर नोकरी मिळालेल्या उमेदवारांना २ लाखांपर्यंत पगार दिला जाणार आहे. तुम्हाला मुंबई मेट्रोमध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल तर तुम्ही वेळ न घालवता अर्ज करू शकता. या जागा कोणत्या पदांसाठी आहे, अर्ज कसा करायचा आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे; याशिवाय पगार, वयोमर्यादा आणि इतर सविस्तर माहिती आज आपण जाणून घेऊ या.
मुंबई मेट्रोमध्ये अंतर्गत सहाय्यक महाव्यवस्थापक, उप अभियंता आणि कनिष्ठ अभियंता ही पदे भरली जाणार आहेत. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी मुंबई मेट्रोच्या अधिकृत वेबसाइट mmrcl.com वर २७ नोव्हेंबरपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
रिक्त जागा किती?
१. सहाय्यक महाव्यवस्थापक (सिव्हिल)चं १ पद
२. उपअभियंता (स्थापत्य) ची ५ पदे
३. कनिष्ठ अभियंता-II (स्थापत्य) चे १ पद अशी एकूण ७ पदे भरली जाणार आहेत.
पात्रता निकष:
मुंबई मेट्रोमधील सहाय्यक महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पूर्णवेळ सिव्हिल इंजिनीअरिंग पदवी असणे आवश्यक आहे. तर ज्युनिअर असिस्टंटसाठी पूर्णवेळ सिव्हिल इंजिनिअर पदवी/डिप्लोमा असणे आवश्यक आहे. याशिवाय पदानुसार अनुभव असणेही महत्त्वाचे आहे. अधिकृत वेबसाइटवरील नोटिफिकेशनमध्ये याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
वयोमर्यादा
मुंबई मेट्रोच्या या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांचे कमाल वय ३५ वर्षे असावे. उमेदवारांच्या वयाची गणना १ नोव्हेंबर २०२४ रोजी केली जाईल. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सवलत देण्यात येणार आहे.
वेतन:
सहाय्यक महाव्यवस्थापक पदासाठी उमेदवारांची किमान सीटीसी ८ लाख, उप अभियंता पदासाठी उमेदवारांची किमान सीटीसी ५ ते ६ लाख आणि कनिष्ठ अभियंता पदासाठी उमेदवारांची सीटीसी ५ लाखांपर्यंत असावा.
त्यानंतर या पदांवर निवडलेल्या उमेदवारांना पदानुसार ३५ हजार २८० रुपये ते २ लाख रुपयांपर्यंत पगार मिळेल.
निवड प्रक्रिया:
या भरतीसाठी उमेदवाराची नियुक्ती मुलाखतीच्या आधारे केली जाईल, तसेच उमेदवाराला शैक्षणिक अटीला पात्र असणे अनिवार्य आहे. ही भरती कंत्राटी आणि प्रतिनियुक्तीवर केली जात आहे. ज्यामध्ये उमेदवारांची निवड कोणत्याही परीक्षेशिवाय थेट वैयक्तिक मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे. २८ डिसेंबर २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या भरती विषयी सखोल माहिती अधिसूचनेमध्ये नमूद करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी जाहीर अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा. यासाठी उमेदवारांनी मुंबई मेट्रो रेल कॉरपोरेशनच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.