- December 23, 2024
- No Comment
पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! उद्यापासून नव्या टर्मिनलवरुन होणार आंतरराष्ट्रीय उड्डाणे

पुणे: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी असून उद्या दि. २४ डिसेंबर २०२४ पासून जुन्या टर्मिनलवरुन होणारी आंतरराष्ट्रीय उड्डाणे नवीन टर्मिनलवरुन होणार आहेत. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारी याबाबतचा आढावा घेतला.
नवीन टर्मिनलवरुन उड्डाणे सुरु करण्यासाठीच्या सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोशल मीडयाच्या माध्यमातून दिली आहे. त्यामुळे मंगळवारपासून नव्या टर्मिनलवरुन आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मुरलीधर मोहोळ यांची ‘एक्स’ पोस्ट
पुणेकरांसाठी गुडन्यूज; आंतरराष्ट्रीय उड्डाणे आता नव्या टर्मिनलवरूनच…
मंगळवार दि. २४ डिसेंबर २०२४ पासून पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील जुन्या टर्मिनलवरुन होणारी सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे आता नव्या टर्मिनलवरून होणार आहेत. यासंबंधीच्या सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्या असून आज या व्यवस्थेचा आढावा घेत याबाबतची सविस्तर माहितीही घेतली.
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या टर्मिनलवरून विमान उड्डाणांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा विमानांची संख्यादेखेत देखील वाढ आहे. शनिवार, रविवार तर तब्बल 200 पेक्षा जास्त विमान उड्डाणे होत आहेत. शिवाय पुण्यातून देशातील 35 विमानतळांसह तीन आंतरराष्ट्रीय उड्डाणांना थेट कनेक्टिव्हिटी जोडण्यात आली आहे. मात्र शनिवारी उड्डाणांना उशीर झाल्याने प्रवाशांचे हाल झाले.
https://x.com/mohol_murlidhar/status/1871158339096440992?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1871158339096440992%7Ctwgr%5Ea616e44ddd0168a51d69e4453a8b3fca18a539f0%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F
पुणे विमानतळाला संत तुकारामांचे नाव
महाराष्ट्र विधानसभेत पुण्यातील लोहगाव विमानतळाचे नाव बदलून जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे नाव देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. पुढील आवश्यक कारवाईसाठी आणि विमानतळाच्या नावात बदल करण्यासाठी हा ठराव आता केंद्राकडे पाठवण्यात येईल.





