- December 24, 2024
- No Comment
कीरकोळ वादात प्रवाशाच्या पोटात कोयता खुपसून जीवे मारण्याचा प्रयत्न; अलंकार थिएटरजवळील घटनेत दोघांना अटक

पुणे: कामावरुन पायी घरी जाण्यासाठी रिक्षाची वाट पहात असलेल्या प्रवाशाकडे पाचशे रुपये मागितले. त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने चोरट्याने प्रवाशाच्या पोटात कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
बंडगार्डन पोलिसांनी या दोघा चोरट्यांना २४ तासाच्या आत जेरबंद केले आहे.
गौरव भारत धोकडे, आकाश बाळू कांबळे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत आत्माराम धर्मा आर्ड (वय ४२, रा. अशोकनगर, येरवडा) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार अलंकार थिएटरजवळ रिक्षा स्टॅन्डवर सोमवारी मध्यरात्री साडेबारा वाजता घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्माराम आडे हे कामावरुन घरी जाण्यासाठी रिक्षाची वाट पहात होते. त्यावेळी पॅशन प्रा दुचाकीवरुन एक जण व दुसरा दुचाकीवरुन त्यांच्याजवळ आले. त्यांनी फिर्यादी यांना पाचशे रुपये दे नाही तर तुझा खेळ खल्लास करतो, असे म्हणाला. त्यांनी पैसे देण्यास नकार देताच शर्टाच्या आत लपविलेला कोयता काढून तो फिर्यादीच्या पोटात खुपसला. त्यांनी प्रतिकार केला असता त्यांच डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
बंडगार्डन पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल लोहार, सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शितोळे, पोलीस हवालदार सारस साळवी, पोलीस अंमलदार महेश जाधव हे पेट्रोलिंग करत होते. तेव्हा पोलीस हवालदार सारस साळवी व सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शितोळे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, प्रवाशावर कोयत्याने वार करणारे आरोपी हे आय बी चौकात उभे आहेत. या बातमीची खात्री खातरजमा करुन पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनीच हा हल्ला केल्याचे निष्पन्न झाले आहे.

सदरची कारवाई अपर पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त दीपक निकम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड, गुन्हे निरीक्षक संपतराव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल लोहार, पोलीस उपनिरीक्षक मोहन काळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शितोळे, पोलीस हवालदार सारस साळवी, पोलीस अंमलदार ज्ञाना बडे, शिवाजी सरक, मनोज भोकरे, महेश जाधव या पथकाने केली आहे.




