• December 24, 2024
  • No Comment

अनैतिक संबंधाच्या संशयावरुन ठेकेदारावर कुर्‍हाडीने वार; येरवड्यातील घटना

अनैतिक संबंधाच्या संशयावरुन ठेकेदारावर कुर्‍हाडीने वार; येरवड्यातील घटना

    पुणे: पुण्यातून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन एकाने ठेकेदाराच्या डोक्यात कुर्‍हाडीने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ठेकेदाराच्या डोक्याला गंभीर जखम झाली असून, तसेच त्याने हातावर वार झेलल्याने दोन्ही हातांना गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या आहेत.

    ही घटना येरवडा येथील जयजवाननगर परिसरातील जय शक्ती मंडळाजवळ सोमवारी २३ डिसेंबर रोजी सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

    या प्रकरणी रितेश लक्ष्मण परदेशी (वय-४८, रा. जयजवाननगर, येरवडा) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. उमेश रमेश वाघमारे (वय-३८, रा. बालाजीनगर, धनकवडी) असे आरोपीचे नाव आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी परदेशी यांचा व्यवसाय ठेकेदारीचा आहे. व्यवसायाकरीता ते दुचाकीवरुन चालले होते. त्यावेळी वाटेत वाघमारे याने त्यांना अडविले. लफडे करतो काय, मी तुला आज जिवंत सोडणार नाही, तुला संपवतोच. असे म्हणून काही करण्याच्या आत त्याने कुर्‍हाडीने परदेशी यांच्यावर हल्ला केला.

    दरम्यान, फिर्यादी यांच्या डोक्यात डाव्या भागावर कुऱ्हाडीने जबर वार केले. त्यावेळी परदेशी यांच्या डोक्यात गंभीर दुखापत झाल्याने ते दुचाकीसह खाली पडले. त्यानंतर वाघमारे याने कुर्‍हाडीने त्यांच्यावर अनेक वार केले. त्यांनी त्यांचा जीव वाचविण्यासाठी दोन्ही हात मध्ये केले. त्यमुळे कुर्‍हाडीने दोन्ही हातांना जखमा झाल्या आहेत. परदेशी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

    पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *