• December 25, 2024
  • No Comment

डोके फोडून सोनसाखळी हिसकावणारा सराईत गजाआड, पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाची उल्लेखनीय कामगिरी

डोके फोडून सोनसाखळी हिसकावणारा सराईत गजाआड, पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाची उल्लेखनीय कामगिरी

    पिंपरी-चिंचवड: हातोडीचे घाव घालून महिलेचे डोके फोडले. त्यानंतर महिलेच्या गळ्यातील सोने हिसकावून नेले. याप्रकरणी पोलिसांनी चोरट्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. सलग 72 तास सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून पोलिसांनी चोरट्याची ओळख पटवली.

    पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. ईश्वर कैलास वाल्हेकर (34, रा. बौद्धनगर, एमआयडीसी पिंपरी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

    पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार,सदर महिला लिफ्टमध्ये जात होती. त्या वेळी पाठीमागून आलेल्या आरोपीने त्यांच्या डोक्यात हातोडीने मारले. यामध्ये महिला जखमी झाली. त्यानंतर आरोपीने महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी करून नेली. ही घटना 19 डिसेंबर रोजी घडली. याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

    या गुन्ह्याचा तपास करत असताना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट 4, मालमत्ता गुन्हेविरोधी पथक व गुंडाविरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार यांचे एक पथक तयार करण्यात आले. या पथकाने या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला. पथकाने घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तीन दिवस व रात्र तपासणी केली.

    दरम्यान, आरोपी बनावट नंबरप्लेट लावलेल्या दुचाकीवरून पळून जाताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आला. आरोपी कोणत्या मार्गाने आला आणि पळून गेला. याबाबत तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. तसेच, त्याने वापरलेल्या वाहनाबाबतही पोलिसांनी माहिती मिळवली. त्यावरून ओळख पटवून आरोपीला जेरबंद करण्यात आले.

    पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहायक आयुक्त (गुन्हे 1) डॉ. विशाल हिरे, सहायक आयुक्त (गुन्हे 2) बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट 4 पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप सावंत, मालमत्ता गुन्हेविरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ, गुंडा विरोधी पथकाचे सहायक निरीक्षक हरिश माने, उपनिरीक्षक भरत गोसावी, तसेच पोलिस अंमलदार मोहम्मद गौस नदाफ, तुषार शेटे, प्रशांत सैद, तांत्रिक विश्लेषण विभागाचे नागेश माळी यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *