- December 25, 2024
- No Comment
कानशीलात मारल्याने कोसळून पत्नीचा मृत्यू, पतीवर गुन्हा दाखल
पिंपरी: पत्नीला कानशीलात मारल्याने ती खाली पडली व तिच्या डोक्याला मार लागला. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. ही घटना १६ डिसेंबर रोजी भोसरीतील आळंदी रोड येथे घडली.
खुशबू राजकरण हरीजन (वय २८, रा. जयभीम पार्क, आळंदी रोड, भोसरी) असे मृत्यूमुखी पडलेल्या पत्नीचे नाव आहे. पोलिस हवालदार सचिन दत्तात्रय गोगावले यांनी सोमवारी (दि. २३) भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून याप्रकरणी राजकरण गणेशप्रसाद साकेत (२५) याला अटक केली आहे.
राजकरण याचे पत्नी खशबू हिच्यासोबत १६ डिसेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास भांडण झाले. रागाच्या भरात त्याने पत्नीला कानशीलात मारली. त्यामुळे ती खाली पडून तिच्या डोक्याच्या मागील बाजूला दुखापत झाल्याने तिला रुग्णालयात दखल केले. २१ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. यामुळे राजकरण याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.