• December 26, 2024
  • No Comment

सराईताला वाचवण्यासाठी सत्ताधारी पक्षाच्या बड्या नेत्याचा पोलिसांवर दबाव

सराईताला वाचवण्यासाठी सत्ताधारी पक्षाच्या बड्या नेत्याचा पोलिसांवर दबाव

    पिंपरी: सत्ताधारी पक्षाच्या बड्या नेत्याने काळेवाडी पोलिसांवर दबाव टाकून शहरातील नामचीन गुंड प्रशांत दिघे याचे नाव एका गंभीर गुन्ह्यातून वगळले. मात्र, ही बाब अति वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी आतापर्यंत एकूण १९ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या या गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्याचे आदेश दिले.

    वरिष्ठ पोलिसांनी सत्ताधारी पक्षाच्या नेत्याचा दबाव झुगारून लावल्याने या नेत्याने पोलिसांच्या विरोधात आरोप करायला सुरुवात केल्याचे आता दिसून येत आहे.

    अपघातात वाहनाचे झालेले नुकसान भरून द्यावे, या कारणावरून काळेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी

    (२२ डिसेंबर) मध्यरात्री दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या प्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात दोन्ही गटांनी परस्पर विरोधी फिर्याद दिली. त्यानुसार, दोन्ही गटांतील आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, या हाणामारीत कुख्यात गुंड प्रशांत दिघे याचाही सहभाग होता. परंतु, शहरातील एका बड्या राजकीय नेत्याने दिघे याचे नाव गुन्ह्यातून वगळण्यासाठी स्थानिक पोलिसांवर दबाव टाकला. या दबावाला बळी पडत स्थानिक काळेवाडी पोलिसांनी या गुन्हेगाराचे नाव गुन्ह्यातून वगळले. मात्र, ही गोष्ट वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला सूचना देत आरोपी दिघे याचे नाव गुन्ह्यात घेऊन त्याला अटक करण्याची सूचना दिली. त्यानुसार, स्थानिक पोलिसांनी आरोपी दिघे याला अटक केली.

    मात्र, या गोष्टीने बड्या राजकीय नेत्याचा राग अनावर झाला. सत्ताधारी पक्षाच्या या नेत्याने अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क करून दिघे याच्यावर कारवाई करू नये, असा दबाव टाकला. मात्र, पोलीस अधिकाऱ्यांनी या राजकीय नेत्याचा दबाव झुगारून लावला. त्यामुळे पोलीस कसे चुकीचे काम करतात, कसे पैसे खातात, असे आरोप हा बडा राजकीय नेता करत असल्याची चर्चा सुरू आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *