• December 26, 2024
  • No Comment

देहूगावात तीस वर्षीय तरूणाची इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्या, कारण अस्पष्ट

देहूगावात तीस वर्षीय तरूणाची इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्या, कारण अस्पष्ट

    देहूगाव: देहूगाव येथे एका तीस वर्षीय युवकाने इंद्रायणी नदीच्या पुलावरून नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केल्याचे घटना समोर आली आहे. बुधवारी (दि. 25) दुपारी साडेबाराच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.

    अंकुश गजानन काळोखे (वय 30, रा. देहूगाव, विठ्ठलवाडी) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

    पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार देहूगाव गाथा मंदिर परिसरात इंद्रायणी नदी पात्रामध्ये नदीच्या पुलावरून दुपारी साडे बाराच्या सुमारास काळोखे यांनी उडी घेतली. माहिती मिळाल्यानंतर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. एनडीआरएफ च्या जवानांनी नदीपात्रात शोध घेऊन दुपारी अडीचच्या सुमारास तरूणाचा मृतदेह बाहेर काढला.

    शवविच्छेदनासाठी मृतदेह पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयामध्ये पाठविण्यात आला. सदर युवकाच्या आत्महत्याचे नेमके कारण समजू शकले नाही. याप्रकरणी अधिक तपास देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर खणसे करीत आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *