• December 27, 2024
  • No Comment

थेऊर (ता.हवेली) येथे दहशतवाद विरोधी पथकाने संशयित बांगलादेशी नागरिकास ताब्यात

थेऊर (ता.हवेली) येथे दहशतवाद विरोधी पथकाने संशयित बांगलादेशी नागरिकास ताब्यात

    थेऊर:  (ता.हवेली) येथे दहशतवाद विरोधी पथकाने संशयित बांगलादेशी नागरिकास ताब्यात घेतल्याने एकच खळबळ उडाली.यात हारुलाल पंचानन बिश्वास (वय ५३वर्ष रा.थेऊरगाव) याला ताब्यात घेतले.

    गेली अनेक वर्षापासून थेऊरमध्ये वास्तव्यास असलेल्या संशयित बांगलादेशी हरुलाल विश्वास (मुळ गाव चंचारी ता.कालिया जिल्हा नराईल बांगलादेश ) नागरिकाला दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेतले असून आधी बंगाल नंतर विविध ठिकाणी वास्तव्य करून पुणे येथील थेऊर येथे अनेक वर्षांपासून वास्तव्यास असून त्याच्या विरुद्ध अवैधरित्या देशात घुसून वास्तव्य करणे तसेच भारतातील रहिवासी कागदपत्रे आधार कार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट असे विविध बनावट कागदपत्र तयार करून राहिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    भारत सरकारकडून देशात अवैधरित्या वास्तव्य करून राहणाऱ्या बांग्लादेशी नागरिकांचा शोध घेण्याची मोहीम राबविण्यात येत असून मंगळवारी पुणे पोलीसांचे दहशतवाद विरोधी पथकाने हवेलीतील थेऊर येथून गेली कित्येक वर्ष वास्तव्यास असलेल्या संशयित बांग्लादेशी नागरीकास ताब्यात घेऊन त्याच्याविरूद्ध देशात अवैधरित्या घुसखोरी करून वास्तव्य करणे तसेच भारत बांगलादेश सिमा मुलकी अधिकाऱ्यांच्या कोणत्याही परवानगी शिवाय देशात राहिल्या बदल गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

    गेली अनेक वर्षांपासून हा संशयीत थेऊर येथे वैद्यकीय व्यवसाय करतो आहे. पोलीस तपासात आणखी बाबी समोर येण्याची शक्यता आहे. लोणी-काळभोर पोलीसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

    सदरची कारवाई दहशतवाद विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार यांच्या पथकाने केली. पुढील तपास लोणी काळभोर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके, पोलिस हवालदार विशाल बनकर करीत आहेत.

    प्रतिनिधी दिगंबर जोगदंड लोणी काळभोर

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *